नाशिक : विहितगाव येथील तलाठीसह एन्य एक जण लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात

लाचखोर

नाशिक; पुढारी वृत्तसेवा : विहितगाव येथील तलाठीवर लाचलुचपत विभागाने  तुकडा नियमाधिकरण आधीमूल्य हा शेरा तक्रारदाराच्या पतीचे नाव असलेल्या क्षेत्रापुरता कमी करण्यात यावा यासाठी एका तलाठ्यासह खाजगी इसमाने तीन हजार रुपयांची लाच घेतली.

याप्रकरणी विहितगाव येथील तलाठी संशयित सतीश गिरीश नवले (४८, रा.उपनगर) आणि दत्तात्रय सुखदेव ताजनपुरे (४३, रा. नाशिकरोड) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने लाच घेताना रंगेहाथ पकडले आहे. दरम्यान, ०.०१ क्षेत्राचे मूल्यांकन रक्कम एक लाख रुपये पैकी 25% म्हणजे पंचवीस हजार रुपये तक्रारदार महिलेने यापूर्वी भरणा केला होती. उर्वरित कामकाज पूर्ण करण्यासाठी तलाठी व खाजगी इसमाने ही लाच घेतल्याची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे करण्यात आली. या तक्रारीनंतर संबंधित तलाठीसह खासगी व्यक्तीवर करण्यात आली.

The post नाशिक : विहितगाव येथील तलाठीसह एन्य एक जण लाच घेताना लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात appeared first on पुढारी.