पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
तालुक्यातील निजामपूर येथे पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत,निजामपूर-जैताणे गावात तब्बल १७ जणांना चावा घेतला. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या पाचजणांना नंदुरबार येथे उपचारांसाठी हलविण्यात आले आहे. दरम्यान, या प्रकारामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे.
शुक्रवार, दि.17 सकाळी शाळेतील दोन लहान शालेय विद्यार्थिनींना पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतल्यानंतर तो सैरभैर धावत सुटला. त्यानंतर त्याने भाजी विक्रेते, टरबूज विक्रेते यांनाही चावा घेतला. सायंकाळी उशिरापर्यंत तब्बल १७ जणांना त्या कुत्र्याने चावा घेतला आहे. कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्यांना जैताणे प्राथमिक आरोग्य केंद्रात इंजेक्शन देण्यात आल्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.आकाश गावीत यांनी सांगितले. कुत्र्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या पाच रुग्णांना जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी पाठविण्यात आले आहे. दरम्यान, गावात लहान मुलांना, लोकांना खबरदारीच्या दृष्टीने सोशल मीडियावरून व्हायरल करण्यात आले आहे. मोकाट कुत्र्यांचा ग्रामपंचायतीने बंदोबस्त करावा अशी मागणी संतप्त नागरिकांनी केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातील नगरपालिका हद्दीतील भटके कुत्रे पकडून रात्रीच्यावेळी निजामपूर जैताणे येथे सोडण्यात येतात असे प्रकार ताबडतोब बंद व्हावेत, अशी मागणी होऊ लागली आहे.
हेही वाचा:
- नगर : कामावर हजर व्हा; अन्यथा कारवाई! सीईओंची कर्मचार्यांना नोटीस
- पुणे : इथेनॉलमुळे कारखान्यांना चांगले दिवस : साखर आयुक्त शेखर गायकवाड
- नाशिक : वातावरणाच्या लहरीपणाचा गृहउद्योगांना बसतोय फटका
The post पिंपळनेर : पिसाळलेल्या कुत्र्याचा १७ जणांना चावा appeared first on पुढारी.