
पिंपळनेर (ता. साक्री) : पुढारी वृत्तसेवा
पिंपळनेर मॅरेथान २०२३ सिझन २ मध्ये १० कि.मी. स्पर्धेत दिनेश समस वसावे याने ३१ मिनिटे २२ सेकंदांत अंतर पार करून प्रथम क्रमांक मिळविला.
यावेळी ५ कि.मी.पुरुष, महिला गट व फॅमिली रन आदींमध्ये ५३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. आदित्य फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. योगिता चौरे व डॉ. जितेश चौरे यांनी स्पर्धेचे उद्घाटन केले. आदित्य फाउंडेशन व सुहरी रुग्णालय यांच्यातर्फे पिंपळनेर मॅरेथान २०२३ सिझन २-‘अंतर्गत रन फॉर हेल्थ’चे आयोजन करण्यात आले. यामध्ये १० किलोमीटर, ५ किलोमीटर, ३ किलोमीटर, फॅमिली रन तसेच लहान मुला-मुलींची स्पर्धा झाली. 10 किलोमीटर गटात प्रथम दिनेश वसावे (नंदुरबार), द्वितीय सोमनाथ पावरा शिरपूर, तृतीय तुषार अपसिंग पाडवी (नंदुरबार) यांनी मिळविला. स्पर्धा नवापूर रोडवरील सुहरी हॉस्पिटल येथून सुरू झाली यावेळी आदित्य फाउंडेशनच्या अध्यक्षा डॉ. योगिता चौरे, सभापती जगदीश चौरे, जितेश चौरे, सामाजिक कार्यकर्त्या डॉ. प्रतिभा चौरे यांसह आदी उपस्थित होते. बी. एस. कोठावदे, रत्नप्रभा बागूल यांनी सूत्रसंचालन केले.
स्पर्धेतील विजयी असे…
५ कि.मी.पुरुष गटात पवार पावरा प्रथम, ५ किमी पुरुष गटात प्रथम नारायण पवार (नंदुरबार), द्वितीय शशिकांत चौरे (शिरपूर), तृतीय प्रवीण गायकवाड (धुळे), ५ किमी स्त्री गटात प्रथम शेवता पावरा (शिरपूर), द्वितीय मेहक वसावे (नंदूरबार), तृतीय दीपिका पवार (पिंपळनेर) यांनी मिळविला. विजेत्यांना अनुक्रमे तीन हजार, दोन हजार व १ हजार रुपये, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देण्यात आले. स्पर्धेत भालचंद्र ततार व सुभाष जगताप हे ज्येष्ठ नागरिकही धावले.
हेही वाचा:
- ‘ओआरओपी’चा तिढा लवकर सोडवा अन्यथा अवमानना नोटीस जारी करु : सर्वोच्च न्यायालय
- पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: पीएमपीकडून अनेक बस मार्गांच्या वेळेत बदल
- पुणेकरांसाठी महत्वाची बातमी: पीएमपीकडून अनेक बस मार्गांच्या वेळेत बदल
The post पिंपळनेर : 'फॅमिली रन'मध्ये उत्स्फूर्त सहभाग नोंदवत ५३५ स्पर्धकांची दौड appeared first on पुढारी.