
पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
शासकीय विश्रामगृह पिंपळनेर येथे साक्री तालुका काॅंग्रेस पार्टी व महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान साक्री यांच्या वतीने आधुनिक विचार आणि असाधारण निर्णय क्षमता असलेले भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व.राजीव गांधी यांच्या 32 व्या पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी साक्री तालुक्याचे माजी आमदार डी. एस. अहिरे, धुडकु भारूडे, पंचायत समिती सदस्य साक्री, रमेश सुर्यवंशी, तालुका उपाध्यक्ष कॉंग्रेस पार्टी गणेश गावित, तालुका सरचिटणीस कॉंग्रेस पार्टी, योगेश चौधरी, माजी जि. प. सदस्य धुळे, तानाजी बहिरम, जिल्हाध्यक्ष, महाराष्ट्र राज्य आदिवासी बचाव अभियान धुळे, ईश्वर गायकवाड, तालुका सचिव, कॉंग्रेस पार्टी, मगन दाजी माळचे, उपसरपंच बोढरेपाडा, विजय दादा वाघ, दिलीप आहिरे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
हेही वाचा:
- जळगावात नाकाबंदी दरम्यान हद्दपार आरोपीस अटक
- पिंपळनेर : गारेगार जार खरेदीकडे कल वाढल्याने माठ विक्रेत्यांवर परिणाम
- पिंपळनेरच्या स्टेट बँकेची केली फसवणूक; तिघांवर गुन्हा दाखल
The post पिंपळनेर : भारताचे माजी पंतप्रधान, भारतरत्न स्व. राजीव गांधी यांना अभिवादन appeared first on पुढारी.