पिंपळनेर : राष्ट्रीय विज्ञान दिनी विद्यार्थ्यांच्या कुतूहलाला मार्ग मिळून शास्त्रीय संकल्पना स्पष्ट 

पिंपळनेर www.pudhari.news

पिंपळनेर,(प्रतिनिधी) : पुढारी वृत्तसेवा
येथील श्रीमती मनकर्णाबाई विनायकराव मराठे महिला शिक्षणशास्त्र महाविद्यालय व इंदिरा गांधी माध्यमिक विद्यालय यांच्यातर्फे राष्ट्रीय विज्ञान दिवस विविध कार्यक्रमांनी उत्साहात साजरा करण्यात आला. बी.एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ.सतीश पाटील अध्यक्षस्थानी होते. संचालक के.एस.गांगुर्डे यांनी प्रदर्शनाचे उद्घाटन केले. यावेळी बीएड कॉलेजच्या विद्यार्थिनींनी विज्ञानावर आधारित विविध पोस्टर, शैक्षणिक साधने, वैज्ञानिक उपकरणे यांचे प्रदर्शन आयोजित केले होते. प्रदर्शनातून विद्यार्थ्यांचे वैज्ञानिक कुतूहल जागृत होऊन त्यांच्या शास्त्रीय संकल्पना स्पष्ट झाल्या.

प्राचार्य डॉ.सतीश पाटील यांनी डॉक्टर सी.व्ही.रामन यांचे वैज्ञानिक कार्य व विज्ञान दिवस यांचे महत्त्व सांगितले. कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी बीएड कॉलेजचे प्राध्यापक, प्राध्यापिका,विद्यालयाचे या वेळी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारीऱ्यांनी तसेच बीएड कॉलेजच्या महिला विद्यार्थी प्रयत्न केले. छात्र शिक्षकांनी मनोगतातून डॉ.सी.व्ही.रामन व विज्ञान दिवस याविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. विज्ञान शिक्षक जे.एन.मराठे यांनी ‘विज्ञान काल,आज व उद्या’ याविषयी, तसेच विज्ञानाचा उपयोग जनकल्याणासाठी विवेकाने व्हावा. यासाठी अनेक उदाहरणांसह विद्यार्थ्यांना शास्त्रीय माहिती दिली. बीएड कॉलेजच्या द्वितीय वर्षातील विद्यार्थिनी सायली देसले व प्रांजली शिरसाठ यांनी सूत्रसंचालन केले. प्रथम वर्षातील विद्यार्थिनी लीना साळुंके यांनी आभार मानले.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : राष्ट्रीय विज्ञान दिनी विद्यार्थ्यांच्या कुतूहलाला मार्ग मिळून शास्त्रीय संकल्पना स्पष्ट  appeared first on पुढारी.