भाजपमध्ये मोठे फेरबदल, नाशिक शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव

प्रशांत जाधव भाजप शहराध्यक्ष,www.pudhari.news

नाशिक : पुढारी ऑनलाइन डेस्क 

भारतीय जनता पार्टीच्या संघटनात्मक रचनेत महत्वपूर्ण बदल करण्यात आला असून जिल्हाध्यक्षांची नवी टीम जाहीर करण्यात आली आहे. नाशिक शहराध्यक्षपदी माजी नगरसेवक प्रशांत जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर ग्रामीण जिल्हाध्यक्षपदी सुनिल बच्छाव व शंकर वाघ यांची नियुक्ती झाली आहे.

आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने हा बदल केला असून राज्यातील केंद्रीय नेतृत्व, राज्याचे नेतृत्व आणि प्रदेश कार्यकारिणीशी चर्चा करून राज्यातील एकुण ७० संघटनात्मक जिल्हाध्यक्षांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात नाशिकचाही समावेश आहे.  नाशिकमध्ये, भाजपच्या शहराध्यक्षपदी यापूर्वी गिरीश पालवे हे होते. आता प्रशांत जाधव यांना संधी देण्यात आली आहे.

 

The post भाजपमध्ये मोठे फेरबदल, नाशिक शहराध्यक्षपदी प्रशांत जाधव appeared first on पुढारी.