हवाई सेवेच्या माहितीसाठी महामार्गांवर ‘ब्रॅण्डिंग बोर्ड’; ‘मी नाशिककर’चा पुढाकार

board www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

नाशिकचे विमानतळ आणि तेथून उड्डाण होणाऱ्या हवाई सेवांचे नियमित ब्रॅण्डिंग व्हावे, यासाठी ‘मी नाशिककर’ संस्थेाशिकला येणाऱ्या पाचही रस्ते मार्गांवर नाशिक विमानतळ व तेथून उपलब्ध सेवांची माहिती देणारे ‘ब्रॅण्डिंग बोर्ड’ उभारण्यात आले आहेत. हे सर्व बोर्ड्स पीपीपी मॉडेलने उभारल्याची माहिती ‘मी नाशिककर’चे संजय कोठेकर यांनी दिली.

नाशिकमध्ये येणाऱ्या मार्गांवर एकूण ६१ बोर्ड लावले असून, त्यामध्ये घोटी ते गरवारे, गरवारे ते द्वारका, द्वारका ते आडगाव, आडगाव ते एअरपोर्ट, ओढा ते औरंगाबाद नाका, सिन्नर ते रोड फ्लायओव्हर, त्र्यंबक ते नाशिक तसेच कसारा ते घोटी, पिंपळगाव ते एअरपोर्ट, जव्हार ते त्र्यंबक, पेठरोड ते नाशिक, दिंडोरी ते नाशिक या मार्गांवर फलक लावले आहेत. ‘ब्रॅण्डिंग बोर्ड’ या उपक्रमामुळे नाशिककर तसेच नाशिकला येणाऱ्या सर्व प्रवासी नाशिककरांना नाशिकहून विविध ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या विमानसेवांची माहिती नियमितरीत्या मिळेल. ज्यामुळे विमानसेवेबाबत जनजागृती होईल. या उपक्रमासाठी नॅशनल हायवे ॲथाॅरिटी ऑफ इंडियाचे प्रकल्प अभियंता नितीन पाटील व कंत्राटदार एस. एस. एन्टरप्राइजेसचे सहकार्य मिळाले असून, नाशिकच्या अनेक कंपन्यांनी स्वेच्छेने आर्थिक सहकार्य केले आहे. या उपक्रमांतर्गत पहिल्या टप्प्यात एकूण ६१ बोर्ड्स लावले असून, यामध्ये सुला वाइन यार्ड्सने २०, अशोका बिल्डकॉनने १५, फॉक्स कंट्रोल सोल्युशन्सने १०, ॲक्सेस ग्रुपने १४, ई-बनिया ग्रोसरी प्रा.लि.ने १० व विवेदा वेलनेसने 6 बोर्ड्सचा खर्च उचलला आहे. यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये अजून ५० बोर्ड उभारणार असून, यासाठी संस्थांनी पुढे यावे, असे आवाहन ‘मी नाशिककर’तर्फे करण्यात आले आहे.

हेही वाचा:

The post हवाई सेवेच्या माहितीसाठी महामार्गांवर 'ब्रॅण्डिंग बोर्ड'; 'मी नाशिककर'चा पुढाकार appeared first on पुढारी.