अंबड येथील अल्पवयीन मुलाची अपहरण करून हत्या, पाच संशयित ताब्यात

  • Post author:
  • Post category:Uncategorized

सिडको; पुढारी वृत्तसेवा : अंबड मध्ये इयत्ता आठवीत शिकणाऱ्या मुलीचे अपहरण करुन हत्या केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी पाच संशयितांना अटक केली आहे.

अंबड भागात खुनाचे सत्र सुरुच आहे. दोन दिवसांपूर्वी झालेल्या भांडणाची कुरापत काढून चार ते पाच जणांच्या टोळक्याने अंबड येथील इयत्ता ८ वी मध्ये शिकत असलेल्या सोळा वर्षीय अल्पवयीन मुलाचे अपहरण करून त्यास बेदम मारहाण करुन खून केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी अंबड पोलिसांनी एका अल्पवयीनसह पाच संशयितांना ताब्यात घेतले आहे. राजा गब्बर सिंग (वय १६ रा. स्वामीनगर, अंबड) असे खून झालेल्या अल्पवयीन मुलाचे नाव आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी (दि.२४) सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास मयत राजा सिंग याचे संशयीतांसोबत दत्तनगर येथे भांडण, हाणामारी झाली होती. भांडणाचा राग मनात ठेवत चार ते पाच जणांच्या टोळक्याने शनिवारी (दि. २५)  शनिवारी सायंकाळी अंबडगाव येथून राजा सिंग याचे अपहरण केले. त्यानंतर विल्होळी येथील एका खडी क्रशर जवळ उचलून नेले. त्याठिकाणी त्याला बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत राजा सिंग याचा मृत्यू झाल्याचे तक्रारीत म्हटले आहे. तो मयत असल्याचे लक्षात येताच संशयितांनी त्याला राजूर बहुला परिसरातील एका निर्जन स्थळी फेकून दिले. राजा सिंग हा रात्री उशिरापर्यंत घरी न आल्याने वडील गब्बर परशुराम सिंग (वय ४२ रा. स्वामीनगर अंबड) यांनी रविवारी अंबड पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली.

पोलिसांनी अल्पवयीन मुलाचा शोध सुरू असताना वाडी वाऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका ठिकाणी गुरख्याला मृतदेह आढळून आला. त्यांनी वाडीवहे पोलिसांना माहिती दिली. त्यांनंतर अंबड पोलिस अपहरण झालेल्या युवकाचा तपास करताना राजूर बहुला परिसरात मृतदेह आढळल्याचे पोलिसांना समजले. यावेळी पोलिसांनी घटनास्थळी जात शहानिशा केली असता अपहरणातील मृतदेह असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर एमआयडीसी पोलीस चौकीचे पोलीस निरीक्षक मनोहर कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार व पोलीस नाईक जनार्दन ढाकणे यांनी तपासचक्रे फिरवत राजा सिंग याचा खून करणाऱ्या पाच संशयीतांना ताब्यात घेतले त्यात एक अल्पवयीन आहे .याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात संशयित विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली सहायक पोलीस निरीक्षक वसंत खतेले यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मयत राजा सिंग याच्या पश्चात आई. वडील बहीन असा परिवार आहे घरातील एकुलता मुलाचा खून झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे . मयत हा इयत्ता ८ वी इयत्तेत शिकत होता

The post अंबड येथील अल्पवयीन मुलाची अपहरण करून हत्या, पाच संशयित ताब्यात appeared first on पुढारी.