आशिमा मित्तल : चोरीला गेलेल्या रस्त्यांची बाह्य यंत्रणांद्वारे तपासणी होणार

जिल्हा परिषद नाशिक

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
गेल्या काही दिवसांपासून रस्ते चोरीला गेल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेला प्राप्त झाल्या आहेत. यापैकी मालेगाव तालुक्यातील टोकडे येथील रस्त्याबाबत कार्यकारी अभियंत्यांनी पाहणी करूनदेखील तक्रारी कायम असल्याने जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी आता बाह्य यंत्रणेद्वारे तपासणी करणार असल्याचे सांगितले.

मालेगाव तालुक्यातील टोकडे गावातील रस्ता तयार न करताच त्याची देयके अदा करण्यात आली होती. याबाबत सामाजिक कार्यकर्ते विठोबा द्यानद्यान यांनी रस्ता चोरीला गेल्याची तक्रार करत रस्ता शोधून देणार्‍याला लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी मित्तल यांनी कार्यकारी अभियंता यांना जागेवर जाऊन रस्त्याची पाहणी करण्याचे आदेश दिले होते. त्यांनी रस्ता असल्याचा अहवाल सीईओंना सादर केला होता. त्यानंतर ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेत धाव घेत जर रस्ता आहे, तर तो आमच्या जमिनीतून गेला असल्याची तक्रार केली होती. त्याचप्रमाणे इगतपुरी तालुक्यातील कुर्‍हेगाव येथील रस्ता असतानाही पुन्हा रस्ता करण्याची प्रक्रिया राबवून त्याची बिलेदेखील काढल्याची तक्रार सरपंचांनी कार्यकारी अभियंत्यांकडे केली होती. या दोन्ही प्रकरणांत जिल्हा परिषदेच्या अधिकार्‍यांऐवजी बाह्य यंत्रणेमार्फत चौकशी करण्यात येणार असल्याचे आशिमा मित्तल यांनी स्पष्ट केले. दरम्यान या प्रकरणाची शहानिशा झाली नाही तर रस्त्याचा शोध घेण्याची जबाबदारी सीबीआयकडे द्यावी, अशी मागणी करणार असल्याची माहिती विठोबा द्यानद्यान यांनी दिली आहे.

17 लाखांचे बिल अदा
दरम्यान, 29 ऑक्टोबर 2021 ला रस्त्यासाठी तत्कालीन सीईओ लीना बनसोड यांनी या कामासाठी प्रशासकीय मान्यता दिली होती. रस्त्याचे काम ठेकेदाराने पूर्ण करून त्याबाबत जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांनी पाहणी करत पूर्ण झाल्याचा दाखला दिला होता. तसेच ठेकेदाराला 17 लाख 84 हजारांचे बिलदेखील अदा करण्यात आलेले आहे.

हेही वाचा:

The post आशिमा मित्तल : चोरीला गेलेल्या रस्त्यांची बाह्य यंत्रणांद्वारे तपासणी होणार appeared first on पुढारी.