एसकेडीच्या विद्यार्थ्यांची रस्सीखेच स्पर्धेत राज्यस्तरावर निवड

देवळा www.pudhari.news

देवळा : पुढारी वृत्तसेवा

दोंडाईचा जिल्हा धुळे येथे पार पडलेल्या 14 वर्षाखालील मुले व मुली, 17 वर्षाखालील मुले व मुली व 19 वर्षाखालील मुले व मुलींच्या विभागीय शालेय स्पर्धेत तालुक्यातील भावडे येथील एस. के. डी. इंटरनॅशनल शाळेच्या 14 वर्षे वयोगटाखालील मुलांची राज्यस्तरावर रस्सीखेच स्पर्धेत निवड झाली आहे.

स्पर्धेसाठी विभागातून एकूण आठ संघांनी सहभाग नोंदविला होता. विजयी संघांमधील समर्थ जोंधळे, दर्शन अहिरे, अथर्व कापडणीस, कृष्णा आवारे, ऋत्विक चव्हाण, शौर्य गुंजाळ, आयुष बनसोडे, ईशांत गुंजाळ, आदित्य पवार, स्वरूप ढाके, चैतन्य बोरसे या विद्यार्थ्यांचे विद्यालयाच्या वतीने व संस्थेचे अध्यक्ष संजय देवरे, सचिव मीना देवरे, प्राचार्य एस. एन. पाटील, एन. के.वाघ यांच्यावतीने अभिनंदन करण्यात आले. तसेच 14 वर्षाखालील मुलींच्या संघाची तिसऱ्या स्थानावर निवड झाली. यशस्वी विद्यार्थ्यांना विद्यालयाचे क्रीडाशिक्षक मुदसर जमील सय्यद, गगन कुमार सिंग, पंकज चेतलापल्ली, जयंता बिसवास, यज्ञेश आहेर, सारिका शिंदे यांचे मार्गदर्शन लाभले.

हेही वाचा:

The post एसकेडीच्या विद्यार्थ्यांची रस्सीखेच स्पर्धेत राज्यस्तरावर निवड appeared first on पुढारी.