खडसेंनी स्वत: मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांच्याकडून घेण्यात आला : गिरीश महाजन

जळगाव, पुढारी वृत्‍तसेवा : एकनाथ खडसे यांच्यावर आरोप झाल्यानंतर त्यांनी स्वतः राजीनामा दिला नव्हता  त्यांच्याकडून तो घेण्यात आला होता, असा दावा ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आज ( दि. २५ ) केले.  भूखंड घोटाळाप्रकरणी चौकशी पूर्ण होईपर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांनी केली होती. यावर  महाजन बोलत होते.

या वेळी मंत्री गिरीश महाजन म्हणाले, न्यायालयाकडून मुख्यमंत्री शिंदे यांनी राजीनामा द्यावा, याबाबत कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. गेल्या काही वर्षापासून खडसे यांचे जावई जेलमध्ये आहेत. त्यांना सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत. आपण काय पराक्रम केले आहेत, हे सर्व जनतेला व जळगाव जिल्हावासियांना माहिती असल्याचा टोला देखील गिरीश महाजन लगावला.

संजय राऊत यांना गंभीरतेने घ्यायचे का?

दिशा सॅलियन मृत्‍यू प्रकरणी ‘एसआयटी’ चौकशी पूर्ण झाल्यावर सत्य समोर येईल.  त्यामुळे संपूर्ण चौकशी झाल्याशिवाय याप्रकरणी बोलता येणार नाही. शिवसेना खा. संजय राऊत यांनी एसआयटीच्या माध्यमातून खोक्याची देखील चौकशी झाली पाहिजे, अशी टीका शिंदे-फडणवीस सरकारवर केली होती. यावरून आज गिरीश महाजन यांनी एसआयटी चौकशीबाबत न बोलता चौकशी पूर्ण झाल्यावर बोलणे योग्य राहील, अशी प्रतिक्रिया दिली.

हेही वाचा :

The post खडसेंनी स्वत: मंत्रीपदाचा राजीनामा दिला नाही, त्यांच्याकडून घेण्यात आला : गिरीश महाजन appeared first on पुढारी.