दहावीचा निकाल आज ; नाशिक विभागातील दोन लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ठरणार

दहावी-बारावीचे निकाल

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा अर्थात इयत्ता दहावीच्या परीक्षेचा निकाल शुक्रवारी (दि. २) दुपारी १ ला ऑनलाइन पद्धतीने जाहीर होणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांना राज्य शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन निकालाची ऑनलाइन प्रिंटआउट काढून घेता येणार आहे. या निकालाकडे विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकाचे लक्ष लागले आहे.

राज्य मंडळाची इयत्ता दहावीची परीक्षा दि. २ ते २५ मार्च २०२३ या कालावधीत पार पडली. यासाठी नाशिक विभागातून १ लाख ९७ हजार ३३४ विद्यार्थी बसले होते. त्यात १ लाख ७ हजार २५० मुले आणि ९० हजार ८४ मुलींचा समावेश होता. विभागातील ४५६ केंद्रांमध्ये दहावीची परीक्षा झाली होती. नाशिक जिल्ह्यातून सर्वाधिक ९१ हजार ६६९, तर नंदुरबार जिल्ह्यातून सर्वात कमी २० हजार ३५७ परीक्षार्थी होते. जळगाव जिल्ह्यातून ५६ हजार ८६०, तर धुळे जिल्ह्यातून २८ हजार ४४८ विद्यार्थी परीक्षेला सामोरे गेले होते.

दरम्यान, इयत्ता बारावीच्या निकालानंतर लागून असलेली इयत्ता दहावीच्या निकालाची उत्सुकता आता संपली आहे. राज्य शिक्षण मंडळाकडून निकालाची अधिकृत तारीख जाहीर झाल्यामुळे विद्यार्थ्यांची उत्कंठा अधिकच वाढली आहे. विद्यार्थ्यांना मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर काही तासात निकाल पाहण्यासाठी उपलब्ध करून दिला जाणार आहे.

येथे निकाल बघता येणार

– www.mahresult.nic.in

– http://sscresult.mkcl.org

– https://ssc.mahresults.org.in

– https://hindi.news18.com/news/career/board-results-maharashtra-board

– https://www.indiatoday.in/education-today/maharashtra-board-class-10th-result-2023

– http://mh10.abpmajha.com

हेही वाचा :

The post दहावीचा निकाल आज ; नाशिक विभागातील दोन लाख विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य ठरणार appeared first on पुढारी.