धुळे तालुक्यात वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू ,एक जखमी

वीज कोसळून शेतकरी ठार,www.pudhari.news

धुळे : पुढारी वृत्तसेवा

धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारात वीज कोसळून शेतकऱ्यांच्या मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेत आणखी एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहे.

धुळे तालुक्यातील जुनवणे शिवारामध्ये ज्ञानेश्वर नगराज पाटील (वय 48 वर्ष ) यांचे शेत आहे. या शेतामध्ये गहू पिकाची काढणी आज करण्यात येत होती. या ठिकाणी गावातील केवळबाई मोरे, ज्ञानेश्वर पांडुरंग शिंपी, रामराव देवराम मोरे हे देखील शेतात काम करत होते. सायंकाळी चार वाजेच्या सुमारास अचानक पावसाळी वातावरण तयार झाले. त्यामुळे या सर्व मजुरांनी घरी जाण्याचा निर्णय घेतला. साडेचार वाजेच्या सुमारास ते घरी जात असताना अचानक मोठा आवाज करत वीज कोसळली. यात ज्ञानेश्वर पाटील आणि त्यांची चुलत बहीण केवळबाई मोरे या गंभीर दुखापती झाले. त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र त्यांची वैद्यकीय तपासणी करीत असताना ज्ञानेश्वर पाटील यांचा मृत्यू झाला. तर त्यांची बहीण केवळबाई मोरे या गंभीर जखमी असून त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे .या संदर्भात धुळे तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून महसूल विभागाला ही माहिती देण्यात आली आहे.

हेही वाचा:

The post धुळे तालुक्यात वीज कोसळून शेतकऱ्याचा मृत्यू ,एक जखमी appeared first on पुढारी.