नंदुरबार : एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वन पालांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला जामीन देण्याच्या मोबदल्यात सुमारे एक लाख रुपयांची लाच स्वीकारताना पोलीसांनी रंगेहात पकडले. शहादा येथील वनपाला सह तिघांविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई केली.

यातील तक्रारदार यांचा लहान भाऊ याच्यावर वन्यजीव संरक्षण अधिनियम अन्वये शहादा वनपरिक्षेत्र कार्यालय येथे गुन्हा नोंद असून त्यामध्ये तक्रारदारांचा भाऊ यास अटक केलेली आहे. दाखल गुन्ह्यात तसेच जामीन मिळण्यास मदत करण्यासाठी आरोपी अधिकाऱ्यांनी नेमलेला पंटर म्हणजे खाजगी इसम नदीम खान पठाण, वय 37 वर्ष, राहणार-शहादा जिल्हा नंदुरबार याच्या माध्यमातून दोन लाख रुपये लाचेची मागणी करण्यात आली होती. तडजोडीअंति एक लाख रुपये लाचेची मागणी करून स्वीकारण्याचे मान्य केले.

दरा येथील वनपाल संजय मोहन पाटील, वय – 54 वर्ष आणि वनरक्षक (शहादा वनपरिक्षेत्र अधिकारी) दीपक दिलीप पाटील, वय 27 वर्ष, नेमणूक- कार्यालय शहादा यांच्यासाठी ही लाच मागितल्याचे तपासात आढळले. यांनीच प्रोत्साहन दिले तसेच सरकारी वकीलाकरिता पंचवीस हजार रुपये लाचेची मागणी केली म्हणून गुन्हा नोंद करण्यात आला. सापळा अधिकारी संदीप साळुंखे, पोलीस निरीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, नाशिक यांनी सापळा पथकातील हवा .पंकज पळशीकर, पो. ना. नितीन कराड, पो. ना प्रभाकर गवळी, पो ना प्रवीण महाजन यांच्या समवेत ही कारवाई केली.

हेही वाचंलत का?

The post नंदुरबार : एक लाख रुपयांची लाच घेतल्याप्रकरणी वन पालांसह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल appeared first on पुढारी.