नंदुरबार : झाडाला धडकून कारचा चक्काचूर; दोन तरुणांचा जागीच मृत्यू

नाशिक

नंदुरबार : वेगाने जाणारी कार झाडाला धडकली आणि त्यामुळे झालेल्या भीषण अपघातात कारमधील दोन तरुण जागीच ठार झाले. जेसीबीच्या साहाय्याने कार बाजूला काढावी लागली तसेच पत्रे फाडून मृतदेह बाहेर काढावे लागले इतका भीषण हा अपघात झाला. ही दुर्घटना शहादा येथे आज आषाढी एकादशीच्या सकाळीच घडली.

प्राप्त माहितीनुसार शहादा तालुक्यातील लोणखेडा गावातील रहिवासी अमरसिंग धनसिंग गिरासे ( 28 ) हे आज (दि. 29)  सकाळी नऊ वाजे दरम्यान डंपर चालक विजय विश्राम सोनवणे (23) राहणार डोंगरगाव तालुका शहादा याच्यासह किया सेल्टोस कारने शहादा कडे येत होते. त्यावेळी दादा पेट्रोल पंपच्या पुढे त्यांची कार निंबाच्या एका झाडावर जाऊन आदळली, हा अपघात एवढा भीषण होता की त्यांच्या कारचा जागेवरच चक्काचूर झाला.

लोक धावून आले तथापि कारमधून त्या दोन्ही तरुणांना काढणे शक्य नव्हते. मुसळधार पाऊस कोसळत असल्यामुळे मदत कार्य मिळण्यास उशीर झाला. जेसीबी ची मदत घेऊन कार बाजूला काढण्यात आली आणि पत्रे फाडून दोन्ही तरुणांचे देह बाहेर काढण्यात आले. तथापि डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. किया सेल्टोस ही महागडी कार आहे असे असतानाही या धडकेत तिचा खेळण्यातील मोटारी प्रमाणे चक्काचूर झालेला पाहायला मिळाला. आषाढी एकादशीच्या सकाळीच घडल्याने हळहळ व्यक्त करण्यात आली.

हेही वाचा :

The post नंदुरबार : झाडाला धडकून कारचा चक्काचूर; दोन तरुणांचा जागीच मृत्यू appeared first on पुढारी.