नाशिक : आगरी महोत्सवातून कला, संस्कृतीची ओळख – युवराज संभाजीराजे

sabhajiraje www.pudhari.news

नाशिक (घोटी/ इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा
आगरी समाजाच्या अनेक समस्या आहेत. त्या सोडवण्यासाठी मी आपल्यासोबत असेन. आगरी मोहत्सवाचे आयोजन करत कला, संस्कृती यांसह खाद्य संस्कृतीची ओळख समाजाला होऊन एकसंघ राहण्याची भावना जोपासली जाते. आयोजकांनी दरवर्षी या महोत्सवाचे आयोजन करावे, मी निश्चित येईन, असे आश्वासन युवराज संभाजी महाराज यांनी दिले.

घोटी येथे आयोजित पाचदिवसीय आगरी महोत्सवास भेट दिली असता ते बोलत होते. यावेळी माजी आमदार काशीनाथ मेंगाळ, स्वराज्य संघटनेचे प्रवक्ते करण गायकर, जिल्हाध्यक्ष डॉ. रुपेश नाठे, उपजिल्हाध्यक्ष डॉ. महिंद्र शिरसाठ, तालुकाध्यक्ष नारायण भोसले, आयोजक रामदास भोर, रामदास आडोळे, सुरेश कडू, भगीरथ मराडे, शाहीर बाळासाहेब भगत आदींसह आगरी समाज बांधव उपस्थित होते. युवराज संभाजी महाराज यांचे आगमन होताच जोरदार फटाके वाजवून पुष्पवृष्टी करत आयोजकांनी, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, ‘संभाजी महाराज की जय’ अशा घोषणा देण्यात आल्या. कळसूबाई मित्रमंडळाच्या गिर्यारोहकांनी आणि कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा व मावळ्यांचा वेशभूषा करून छत्रपतींची गारद देत माजी खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांचा आगरी महोत्सवात मोठ्या जल्लोषात स्वागत केले. हरीश चव्हाण, धनराज म्हसणे यांनी सूत्रसंचालन केले. रामदास भोर यांनी आभार मानले. यावेळी समाजबांधव उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : आगरी महोत्सवातून कला, संस्कृतीची ओळख - युवराज संभाजीराजे appeared first on पुढारी.