नाशिक : आदर्श निर्भया गौरव पुरस्कारांचे आज वितरण

निर्भया सामाजिक संस्था www.pudhari.news

नाशिक (सिन्नर) : पुढारी वृत्तसेवा
निर्भया सामाजिक संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यमंदिर येथे शुक्रवारी (दि. 24)  राज्यस्तरीय आदर्श निर्भया गौरव पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन केले आहे.

प्रमुख उपस्थिती म्हणून राज्याच्या महिला आयोग अध्यक्षा रूपाली चाकणकर उपस्थित राहणार आहेत. काणसा, वारणा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष दीपक पाटील, आमदार माणिकराव कोकाटे, माजी आमदार राजाभाऊ वाजे, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा शीतल सांगळे, माजी जिल्हा परिषद सदस्या सीमंतिनी कोकाटे, युवा नेते उदय सांगळे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब वाघ, भाजपचे ज्येष्ठ नेते बंडूनाना भाबड, दीप्ती वाजे, माजी जिल्हा परिषद सदस्या मालती आव्हाड, नंदा भाबड, शकुंतला वाघ आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सामाजिक, राजकीय, आर्थिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांत महिलांसाठी झटणार्‍या, लाखो, शेकडो महिलांना न्याय मिळवून देणार्‍या प्रत्येक व्यक्तींचा सन्मान करण्याकरिता तसेच प्रत्येक स्त्रीला सक्षम बनवून, मुलींना निर्भया करण्यासाठी हा उपक्रम राबविला जात असल्याचे संस्थेच्या वतीने संयोजकांनी सांगितले.

या महिलांचा होणार सन्मान
यावेळी श्रद्धा संजय चोथवे (सिन्नर), स्मिता माने (नाशिक), भीमाबाई जोंधळे (नाशिक), डॉ. संध्या खेडेकर (संगमनेर), नीता केदारे( लोणी), शैला वाघ (संगमनेर), नीता दीदी (येवला), सुनीता नागरे (दातली), जयश्री पाटील (कराड), अ‍ॅड. कविता पराते (नाशिक), आशाबाई लासुरे (नाशिक),नेहा शिंदे (सिन्नर), कीर्ती शिवाजीराव कातकाडे (नायगाव), मैत्री फाउंडेशन (नाशिक) आदी महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : आदर्श निर्भया गौरव पुरस्कारांचे आज वितरण appeared first on पुढारी.