नाशिक : कत्तलीसाठी जनावरांना घेऊन जाणारा ट्रक जप्त

कळवण, पुढारी वृत्तसेवा : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नाशिक जिल्ह्यातील सर्वच भागात पोलीस दलाच्या वतीने नाकाबंदी करण्यात आली आहे. दरम्यान, नाकाबंदी असताना देखील अभोणी पोलिसांनी कत्तलीसाठी घेऊन जात असलेल्या वाहनातून लाखो रुपये किंमतीचे गोवंश जनावरे जप्त केली आहेत. शिवाय, जनावरांची वाहतूक करणारा ट्रक पोलिसांनी जप्त केला असून संशयीतावर गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की, बकरी ईदच्या पार्श्वभूमी जिल्हा पोलीस यंत्रणा सतर्क राहून विविध भागात गोवंशच्या अवैध वाहतूकीवर लक्ष ठेवून ठिकठिकाणी नाकाबंदी सुरू ठेवण्यात आली होती. आभोणा पोलीस स्टेशनच्या हद्दीतील भगुरडी ता कळवण येथील गावाच्या पाठीमागील भागात असलेल्या डोंगराच्या पायथ्याशी घनदाट जंगलात एका आयशर गाडीत अवैध रित्या कत्तलीसाठी गोवंश जनावरे कोंबून ठेवली असल्याची माहिती आभोणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन शिंदे यांना समजली. यानंतर रात्री त्यांनी त्या जंगलात धाव घेऊन गाडीला वेडा घातला असता त्या ट्रकमध्ये भरलेली गोवंश जनावरे आढळून आले.

हेही वाचलंत का?

 

The post नाशिक : कत्तलीसाठी जनावरांना घेऊन जाणारा ट्रक जप्त appeared first on पुढारी.