नाशिक : नाशिक, शिर्डी लोकसभा ही महाविकासतर्फे कॉंग्रेसने लढवावी  – किरण जाधव

नाशिकरोड www.pudhari.news
नाशिकरोड : पुढारी वृत्तसेवा
नाशिक व शिर्डी लोकसभा महाविकास आघाडीच्या वतीने कॉंग्रेसने लढावी. अशी मागणी कॉंग्रेसचे अनुसुचित जाती नाशिक शहर अध्यक्ष
किरण जाधव यांनी नाशिक शहर जिल्हा काँग्रेसच्या बैठकीत केली.
नाशिक शहर जिल्हा काँग्रेसची बैठक नाशिक काँग्रेस कमिटीचे प्रभारी तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. राजू वाघमारे यांच्या उपस्थित झाली. यावेळी पक्षाच्या विविध विषयावर चर्चा होऊन त्यात अनुसुचित जाती नाशिक शहर अध्यक्ष किरण जाधव यांनी आगामी येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या वतीने नाशिक व शिर्डी ही जागा लढवावी. या दोन्ही ठिकाणी आपले उमेदवार निवडून येतील. असा आत्मविश्‍वास त्यांनी बैठकीत व्यक्त केला. यावेळी नाशिक काँग्रेस कमिटीचे प्रभारी तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस डॉ. राजू वाघमारे, शहराध्यक्ष आकाश छाजेड, दिनेश उन्हवणे, सहप्रभारी ब्रिजकिशोर दत्त, माजी मंत्री शोभा बच्छाव, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष राजाराम पानगव्हाणे, सरचिटणीस व नगरसेवक राहुल  दिवे, महिला काँग्रेस अध्यक्षा व नगरसेवक वत्सला खैरे, प्रदेश प्रवक्त्या व नगरसेवक हेमलता  पाटील, अल्पसंख्याक अध्यक्ष हनिफ बशीर, नगरसेविका आशा  तडवी, अनुसूचित जमाती अध्यक्ष मुन्ना ठाकूर, सेवादल अध्यक्ष वसंत ठाकूर, देवळाली कॅम्प अध्यक्ष अजीज शेख, शहर उपाध्यक्ष शाहिद शेख, युवक काँग्रेस उपाध्यक्ष नितीन काकड ,अल्तमश शेख आदी उपस्थित होते.

हेही वाचा:

The post नाशिक : नाशिक, शिर्डी लोकसभा ही महाविकासतर्फे कॉंग्रेसने लढवावी  - किरण जाधव appeared first on पुढारी.