नाशिक : मांडवड येथील जवान संदीप मोहिते शहीद

नांदगाव; पुढारी वृत्तसेवा : नांदगाव तालुक्यातील मांडवड येथील जवान संदीप भाऊसाहेब मोहिते हे लेह-लडाख येथे सैन्याचे मशीन ऑपरेटिंग करत असताना आज (दि.१) अपघातात शहीद झाले.

हवालदार संदीप भाऊसाहेब मोहिते हे भारतीय सैन्य दलातील १०५ इंजिनिअरिंग रेजिमेंट मध्ये कार्यरत होते. ते सन २००९ या वर्षी भारतीय सैन्यदलात भरती झाले होते. त्यांनी पुणे येथे प्रशिक्षण पूर्ण करून सैन्य दलात असताना विविध ठिकाणी कर्तव्य बजावले. त्यात देशातील चंदीगड, आसाम, पठाणकोट, अरुणाचल प्रदेश, लेह लद्दाख, आदि ठिकाणी तसेच विदेशात साउथ सुडान या ठिकाणी ही देशाचे नेतृत्व केले होते.

सध्या ते लेह लद्दाख येथे आपले कर्तव्य बजावत असताना मशीन ऑपरेटिंग करत असताना त्यांचा अपघात झाला. त्यांना तेथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणीसाठी भरती करण्यात आले. वैद्यकीय तपासणीनंतर त्यांना मृत घोषित करण्यात आले, अशी माहिती त्यांच्या सहकाऱ्यांकडून देण्यात आली. जवान संदीप मोहिते यांच्या निधनाची बातमी समजताच मांडवड गावासह नांदगाव तालुक्यात शोककळा पसरली. त्यांच्या कुटुंबात त्यांचे वडील भाऊसाहेब मोहिते, आई प्रमिला मोहिते, पत्नी मनीषा मोहिते, भाऊ शिवाजी मोहिते, श्रीकांत मोहिते व दोन मुलं देवराज आणि दक्ष संदीप मोहिते असा परिवार आहे. जवान यांच्या निवास्थानी नांदगाव तहसीलदार मोरे,नांदगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी, गट विकास अधिकारी दळवी, तालुका वैद्यकीय अधिकारी संतोष जगताप यांनी भेट देत सांत्वन केले

हेही वाचा :

The post नाशिक : मांडवड येथील जवान संदीप मोहिते शहीद appeared first on पुढारी.