नाशिक : मेतकर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध

दिलीप मेतकर www.pudhari.news

नाशिक (देवळा): पुढारी वृत्तसेवा

येथील मधुकर पांडुरंग मेतकर ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेची पंचवार्षिक संचालक मंडळाची निवडणूक बिनविरोध झाली. आर्थिक प्रगतीसोबतच नावीन्यपूर्ण सामाजिक कार्यात सतत आघाडीवर असलेल्या या पतसंस्थेची ही निवडणूक संस्थेचे संस्थापक दिलीप मेतकर यांच्या नेतृत्वाखाली बिनविरोध झाली. नवीन बिनविरोध निवडून आलेल्या संचालकांमध्ये अजय मेतकर, संतोष शिंदे, सुरेश नेरकर, विष्णू जाधव, तेजस मेतकर, केतन लुंकड, जाकीर शेख, शुभांगी मेतकर, माधुरी मेतकर, नितीन शिंपी, गिरीश कचवे, नानाजी चंदन यांचा समावेश आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहकार अधिकारी नितीन तोरवणे यांनी कामकाज बघितले. नवनिर्वाचित संचालकांचे देवळा बाजार समितीचे सभापती योगेश आहेर, मविप्रचे संचालक विजय पगार, उपसभापती अभिमन पवार, संचालक भाऊसाहेब पगार, माजी उपनगराध्यक्ष जितेंद्र आहेर, गटनेते संभाजी आहेर आदींनी अभिनंदन केले आहे.

हेही वाचा:

The post नाशिक : मेतकर पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध appeared first on पुढारी.