नाशिक : लेंडीपूरा भागातील घरास आग लागून  साहित्य जळून खाक

नाशिक, पुढारी वृत्तसेवा : वणीतील लेंडीपूरा भागातील कल्लू बारकु महाले यांच्या राहात्या घरास आज सांयकाळी सहा वाजेच्या दरम्यान घरातून अचानक धुर व आगीच्या ज्वाला येवू लागल्याने परीसरातील तरुणांनी घटनास्थळी धाव घेत घरातील साहीत्य बाहेर काढण्याचा व आग विझविण्यासाठी आसपासच्या घरातून बादल्यांनी पाणी आणून आग विझविण्याचा प्रयत्न केला. यावेळी घटनेची माहीती सरंपच मधुकर भरसट, उपसरपंच विलास कड यांना कळताच घटनास्थळी दाखल होत. ग्रामपंचायतीचा पाण्याचा टँकर घटनास्थळी पाचारण केले.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य जगन वाघ, मनोज थोरात, परेश जन्नानी, अजित थोरात, रवि थोरात, बच्चु देशमुख, भुषन चौधरी, गोटु महाले, कौशल्या पवारआदीसंह शेकडो युवा तरुनांसह ग्रामपंचायत कर्मचारी राजु कटारीया, सुधाकर महाले, भास्कर कोरडे, सुभाष पवार, वसिम मन्सुरी, कौशल्या पवार, दिनकर गांगोडे, बंडू बोथरा आदींसह जगंदबा ग्रुप, हनुमान सेवा समिती सदस्यांनी तसेच लेंडीपूरा येथील तरुण, ग्रामपंतायत कर्मचारी यांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न करुन आग आटोक्यात आणून विझवली. मात्र या आगीत घर पूर्ण जळून खाक झाले असून संसारोपयोगी साहीत्य धान्य, वस्त्र यांचे नुकसान झाले आहे. कल्लु बारकु महाले यांच्या हे मोलमजुरी करुन आपले कुटुंब चालवितात.

अचानक झालेल्या या आकातामुळे सदर व्यक्ती कोलमडली असुन त्यांस नुकसान भरपाई मिळवुन देण्याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सरपंच मधुकर भरसठ यांनी सांगितले. . सदरची आग विद्युत वाहीनीतील शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. आग लागली तेव्हा घरात कुणीही नसल्याने जीवितहानी टळली. घर जुन्या पद्धतीचे कौलारु असल्याने व त्यावर प्लास्टीकने आच्छादन केले असल्याने आगीने तात्काळ उग्र स्वरुप धारण केल्याने जास्त नुकसान झाले.

पिढीत कल्लु बारकु महाले यांची परिस्थिती अत्यंत नाजुक असुन ते मोलमजुरी करतात. या आगीच्या घटनेत घरासह सर्वच संपले असुन अंगावरचे कपड्यांशिवाय काही राहीले नसल्याने त्यांनी मदतीसाठी उपस्थितांकडे याचना केली. दरम्यान ग्रामपालिके तर्फे पिढीत परिवारास जवळील अंगणवाडीत तात्पुरती राहाण्याची व खाण्यापिण्याची सोय करण्यात आली असून पुढील काळात पिढीत कुटुंबाला भरघोस मदत करुन लवकरच त्यांचा संसार उभारण्यास मदत करणार असल्याचे सरपंच मधुकर भरसठ यांनी सांगितले.

The post नाशिक : लेंडीपूरा भागातील घरास आग लागून  साहित्य जळून खाक appeared first on पुढारी.