नाशिक : सहा हरणांची शिकार; सुमारे 92 किलो मांसासह तिघे ताब्यात, दोन फरार

नाशिक (मालेगाव) : पुढारी वृत्तसेवा
शहर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या पथकाने रविवारी (दि. 23) पवारवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत मोठी कारवाई केली. सहा हरणांची शिकार करून त्यांचे मांसविक्रीच्या प्रयत्नातील तिघांच्या मुसक्या आवळण्यात आल्या. विशेष म्हणजे, या संशयितांकडून एक पिस्तूल, चॉपर आदी प्राणघातक हत्यारही हस्तगत करण्यात आले आहेत. पवारवाडी हद्दीतील एका फार्म हाउसमध्ये हरणाचे मांस ठेवण्यात आल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्याप्रमाणे पथकाने सकाळी 9.30 च्या सुमारास छापा टाकला. तेव्हा हरणाचे सहा शीर आणि सुमारे 92 किलो मांस मिळून आले. घटनास्थळावरून पिस्तूल, चॉपर आदी हत्यारेही मिळून आली. सायंकाळी उशिरापर्यंत पाच संशयितांविरोधात गुन्हा नोंदविण्याचे काम सुरू होते. पशुधन विकास अधिकारी डॉ. जावेद खाटीक यांनी मांसाचे नमुने तपासणीसाठी घेतले. तीन नर तर, तीन मादी हरणांचे हे मांस असल्याचे त्यांनी सांगितले.

हेही वाचा:

The post नाशिक : सहा हरणांची शिकार; सुमारे 92 किलो मांसासह तिघे ताब्यात, दोन फरार appeared first on पुढारी.