पिंपळनेर : घोडदे येथे शिवसेना (उ.बा.ठा) शाखेचे अनावरण

पिंपळनेर शाखा www.pudhari.news

पिंपळनेर (ता.साक्री) : पुढारी वृत्तसेवा
हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख यांच्या आशीर्वादाने, शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच युवासेनाप्रमुख तथा शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने मंगळवारी (दि.27) धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यात 15 शाखांचा अनावरणाचा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाप्रसंगी मौजे घोडदे ता.साक्री जि.धुळे येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) शाखेचे अनावरण शिवसेना धुळे जिल्हासंपर्क प्रमुख  माजी आमदार अशोक धात्रक, शिवसेना धुळे सहसंपर्क प्रमुख महेश मिस्तरी, शिवसेना धुळे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, वाहतूक सेनेचे नानू परदेशी, उपसभापती साक्री माधुरी देसले, माजी उपजिल्हाप्रमुख भूपेश शहा आदी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमासाठी शिवसेना उपजिल्हाप्रमुख हिंम्मत साबळे, साक्री तालुकाप्रमुख पंकज मराठे, पिंपळनेर तालुकाप्रमुख अमोल सोनवणे, पं.स.सदस्य राजधर देसले, महावीर जैन, भागचंद टाटिया, पिंटू अण्णा देसले, युवतीसेना तालुकाप्रमुख कामिनी देसले, युवासेनेचे जयेश देशमुख पिंपळनेर शिवसेनेचे महेश वाघ, उदय बिरारी, मनोज खैरनार, तुषार गवळी आदींची शिवसेना पदाधिकाऱ्यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना उपतालुकाप्रमुख अमोल क्षीरसागर, नवनिर्वाचित शाखा प्रमुख किरण क्षीरसागर, उपशाखाप्रमुख अमित सोनवणे, सचिव विजय भिला क्षीरसागर, सहसचिव राजेंद्र यशवंत क्षीरसागर, संजय गांगुर्डे ग्रा.पं सदस्य, ज्येष्ठ नागरिक काशिनाथ क्षीरसागर, भिला देवराव नंदन गुरुजी, गोरख विश्राम क्षीरसागर, सुधाकर क्षीरसागर, ज्ञानेश्वर साळुंखे, प्रमोद क्षीरसागर, अनिल क्षीरसागर, कमलेश क्षीरसागर, दिनेश नहिरे, बाळकृष्ण क्षीरसागर, भालचंद्र क्षीरसागर, गोकुळ घरटे, अनंत क्षीरसागर, योगेश क्षीरसागर, सुनिल महाजन, राजू नंदन, योगेंद्र (बंडू) सोनवणे, अमोल (पप्पू) क्षीरसागर, शांताराम नंदन आदी शिवसैनिकांनी केले.

हेही वाचा:

The post पिंपळनेर : घोडदे येथे शिवसेना (उ.बा.ठा) शाखेचे अनावरण appeared first on पुढारी.