पिंपळनेर : मोबाईल चोर मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात

पिंपळनेर; पुढारी वृत्तसेवा : पिंपळनेर पोलिसांनी एका मोबाईल चोरट्याला अटक केली आहे. अटक केलेला तरुण हा पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील हिस्ट्रीशिटर आहे. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत सदर संशयित आरोपीने मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले आहे. पोलिसांनी त्याला मुद्देमलासह अटक केली असून पुढील तपासात अनेक गुन्हे उघडकिस येण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.

पिंपळनेर पोलीस ठाण्याचे सपोनी श्रीकृष्ण पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस उप निरिक्षक अशोक पवार,पोहेकॉ प्रकश सोनवणे, पोलीस भास्कर सुर्यवंशी, पोलीस प्रकाश मालचे आदी पेट्रोलींग करीत असतांना रात्री अकरा वाजेच्या सुमारास पिंपळनेर बसस्थानक परिसरात एक इसम तोंडाला रुमाल बांधुन संशयितरित्या फिरत असतांना दिसुन आला. दरम्यान पोलीसांचे वाहन पाहुन त्याने पळुन जाण्याचा प्रयत्न केला. पंरतु पोलीस प्रकाश मालचे यांनी त्याचा पाठलाग करून त्यास ताब्यात घेतले.त्यास विचारपुस करता त्याचे नाव यादु ऊर्फ यादया रमेश देसाई (हिस्ट्रीशिटर) (वय 26 रा.लोणेश्वरी भिलाटी पिंपळनेर ता साक्री) असे सांगीतले.सदर इसम पिंपळनेर पोलीस ठाण्याच्या रेकॉर्डवरील हिस्ट्रीशिटर असल्याची पोलिसांना खात्री झाली. तर पोलीसांना या इसमाबाबत अधिकच संशय बळावल्याने त्याची झाडाझडती घेतली असता त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली. पोलिसांनी त्याची अंगझडती घेत असताना सोबत असलेल्या पिशवीत  विविध कंपनीचे एकुण 75 हजार रुपये किंमतीचे तब्बल 11 मोबाईल मिळुन आलेले आहेत. सदर आरोपी हा पिंपळनेर पोलीस ठाणे रेकॉर्डवरील हिस्ट्रीशिटर असून त्याच्याजवळ वेगवेगळया कंपनीचे मोबाईल मिळुन आल्याने प्रत्येक मोबाईलची राष्ट्रीय मोबाईल उपकरण दवारे ओळख नंबर काढुन मोबाईलची ओळख पटविण्यात आलीअसून सर्व मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास असई अशोक पवार करीत आहेत.सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री.संजय बारकुंड,अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे,उप विभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि श्रीकृष्ण पारधी,असई अशोक पवार,असई लक्ष्मण गवळी,पोहेकॉ प्रकाश सोनवणे,पोहेकॉ कांतिलाल अहिरे,पोना प्रकाश मालचे,पोना भास्कर सुर्यवंशी,पोकॉ विजयकुमार पाटील,पोकॉ हेंमत पाटोळे,पोकॉ दावल सैदांणे,पोकॉ पंकज वाघ, रविंद्र सुर्यवंशी,पोकॉ राकेश बोरसे,पोकॉ नरेंद्र माळी आदींनी केली आहे.

The post पिंपळनेर : मोबाईल चोर मुद्देमालासह पोलिसांच्या ताब्यात appeared first on पुढारी.