धुळे : शहीद जवानाच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश वितरीत

dhule

धुळे – पुढारी वृत्तसेवा – भारतीय सैन्यदलातील धुळे जिल्ह्यातील शहीद झालेल्या जवानाच्या कुटुंबियातील सदस्यांना जिल्हाधिकारी जलज शर्मा यांच्या हस्ते आर्थिक मदतीचे धनादेशाचे वितरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील, नायक सुभेदार सतिष रोकडे, जिल्हा सैनिक कार्यालयातील वरीष्ठ लिपिक सहाजी बेरड, लिपिक जितेंद्र सरोदे, श्रीमती माया मनोहर पाटील (वीरपत्नी ), श्रीमती विमलबाई रामचंद्र पाटील (वीरमाता), रामचंद्र परशुराम पाटील (वीरपिता ) आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी शर्मा यांच्या हस्ते श्रीमती माया मनोहर पाटील (वीरपत्नी ) २० लाख ,श्रीमती विमलबाई रामचंद्र पाटील (वीरमाता) २० लाख, रामचंद्र परशुराम पाटील (वीरपिता ) ६० लाख असे एकूण १ कोटी रुपयांचे धनादेश वारसांना वितरीत करण्यात आले. ही रक्कम शासकीय निधीतून ५० टक्के तसेच मुख्यमंत्री सहाय्यता (कारगील ) निधीतून ५० टक्के या प्रमाणात देण्यात आली आहे.

देशाच्या संरक्षणासाठी ज्यांनी आपले प्राणार्पण केले, अशा जवानांच्या पुनर्वसनाच्या विविध कल्याणकारी योजना राबविण्यासाठी ध्वज निधी संकलनात केला जातो. यासाठी जिल्हातील नागरिक, खासगी आस्थापना, अधिकारी व कर्मचाऱ्यांनी ध्वज निधी संकलनात योगदान देण्याचे आवाहनही शर्मा तसेच जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी मेजर डॉ. निलेश पाटील यांनी केले आहे.

The post धुळे : शहीद जवानाच्या कुटुंबियांना जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते धनादेश वितरीत appeared first on पुढारी.