राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा नाशिकमध्ये कँडल मार्च

नाशिक राष्ट्रवादी कँडल मार्च,www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा

भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष व भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल असूनही कारवाई करण्यात आलेली नाही. त्यामुळे दिल्लीच्या जंतर-मंतर मैदानावर कुस्तीवीरांचे आंदोलन चालू आहे. त्यांच्या समर्थनार्थ राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा प्रेरणा बलकवडे यांच्या नेतृत्वाखाली नाशिक जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात कँडल मार्च आयोजित करण्यात आला. बलकवडे व्यायामशाळा भगूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी व व्यायामशाळेतील कुस्तीपटू यांनी मेणबत्ती पेटवून भाजप खासदार बृजभूषण सिंह यांचा निषेध करत कुस्तीपटू महिलांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली.

भाजप खासदार सत्तेचा गैरवापर करून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा व्यक्तीवर कडक कारवाई होण्याची मागणी घेऊन भगूर शहरात मेणबत्ती पेटवून निदर्शने करण्यात आली, तसेच महिला कुस्तीपटूंच्या समर्थनार्थ जिल्ह्याच्या प्रत्येक तालुक्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसतर्फे कँडल मार्च होणार असल्याचे प्रेरणा बलकवडे यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष प्रेरणा बलकवडे, सायरा शेख, विशाल बलकवडे, मयूर चव्हाण, आक्षय येदे, मेहरुनिसा खान, लक्ष्मी झांजरे, भारती भुसाळ, सोनाली जाधव, मनीषा पाटील, सुवर्णा भामरे, संस्कृती सिरसाट, वीरा बलकवडे, दीपाली पाटील, रोहिणी मुकणे, रिहाना खान, राधा जाधव, राहुल कापसे, अजंठा काळे, विकास मोरे, दीपक जाधव, समीर कामाले, अतुल मेदडे, सचिन गुडेकर, किरण पाटील, हेमंत वाघ तसेच महिला पदाधिकारी व कुस्तीपटू उपस्थित होते.

हेही वाचा : 

The post राष्ट्रवादी महिला काँग्रेसचा नाशिकमध्ये कँडल मार्च appeared first on पुढारी.