लासलगाव : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा
लासलगाव शहर व पिंपळगाव नजीक या गावांना जोडणाऱ्या शिवनदी पुलावर बुधवारी दुपारी बाराच्या सुमारास ओम्नी कारला अचानक आग लागून ती खाक झाली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे पुलावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.
ब्राह्मणगाव येथील भाजीपाल्याचा व्यवसाय करणारे सुनील पगारे हे ओम्नी कारमधून (एमएच 15 बीएक्स 0658) कुटुंबासह देवदर्शनासाठी चालले होते. शिवनदी पुलावर त्यांची कार आली असताना तिने अचानक पेट घेतला. कारने पेट घेतल्याचे लक्षात येताच पगारे कुटुंबासह तत्काळ बाहेर आले. आग विझवण्यासाठी स्थानिक युवकांनी मिळेल त्या ठिकाणाहून पाण्याच्या बादल्या आणून सदर आग विझवण्याचा प्रयत्न केला. परंतु आग आटोक्यात आली नाही. लासलगाव पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक लहानू धोक्रट आणि पोलिस कर्मचारी सागर आरोटे तत्काळ घटनास्थळी हजर झाले आणि त्यांनी पाण्याचा टँकर बोलावून आगीवर नियंत्रण मिळवले.
हेही वाचा :
- चंद्रपूर : वाघाच्या हल्ल्यात शेतकरी ठार
- राहुरीत सदस्यांसाठी 226 उमेदवार रिंगणात ; 10 गावांमध्ये निवडणुकीची रणधुमाळी
- नगर : पिंपळगाव लांडगा, चिंचबन, बनपिंप्री ग्रामपंचायती बिनविरोध
The post Nashik Lasalgaon : अचानक पेट घेतल्याने ओम्नी कार जळून खाक appeared first on पुढारी.