Nashik Malegaon : दसाणे शिवारात गोठ्याला आग, एका म्हशीचा होरपळून मृत्यू, आठ जखमी

गोठ्याला आग,www.pudhari.news

मालेगाव मध्य : (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा 

दसाणे शिवारात गोठ्याला आग लागून एका म्हशीचा होरपळून मृत्यू झाला. युवराज दादाजी खैरनार (३५) या शेतकन्याच्या गोठ्याला मंगळवारी  (दि.२५) दुपारी साडेबारा वाजता अचानक आग लागली. त्यात एक म्हैस मृत पावली, तर आठ म्हशी गंभीर जखमी झाल्या.

दसाणे शिवारातील मारुती मंदिराच्या बाजूला खैरनार यांची दहा एकर शेती आहे. याच ठिकाणी त्यांचा दुभत्या म्हशींचा गोठा असून, एकूण दहा म्हशी गोठ्यात बांधलेल्या होत्या. आठ दुभत्या म्हशी, तर चार पारडे होते. दुपारी चाराकुट्टीला अचानक आग लागली. ती गोठ्याकडे पसरली. यावेळी खैरनार दुपारच्या जेवणासाठी गावात घरी गेले। होते, म्हणून शेतात कोणीच नव्हते.

ते परतत असताना त्यांना दुरूनच शेतात धुराचा लोट दिसला. त्यांनी धाव घेतली. तेव्हा उकिरडा जळून चाराकुट्टीमध्येही आग पसरली होती. धावपळीतच त्यांनी गोठ्यातील म्हशी सोडल्या. तरीदेखील आठ म्हशी भाजून गंभीर जखमी झाल्या होत्या, तर एक म्हैस गतप्राण झाली होती.

मालेगाव अग्रिशमन दलाचे बंब मागवण्यात आले. दरम्यान गावातील टँकरही मदतीसाठी धावले. ग्रामस्थ तसेच जवानांनी आगीवर नियंत्रण मिळवले. तत्पूर्वी, आगीत दोन ट्रक चारा तसेच गोठ्यातील गव्हाणी, पत्रे व लाकडी साहित्य जळून खाक झाले होते. पशुवैद्यकीय तज्ज्ञ डॉ. सिकंदर खाटीक यांनी म्हशींची तपासणी करून औषधोपचार केले. या आगीमध्ये शेतकन्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या घटनेचा तत्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यास आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी परिसराती शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा :

The post Nashik Malegaon : दसाणे शिवारात गोठ्याला आग, एका म्हशीचा होरपळून मृत्यू, आठ जखमी appeared first on पुढारी.