oney Trap : पिंपळनेरच्या २७ वर्षीय तरूणाची हनीट्रॅपद्वारे फसवणूक

honey trap on instagram,www.pudhari.news

पिंपळनेर : (जि. धुळे) पुढारी वृत्तसेवा

सोशल मीडियावर फसवणूकीच्या अनेक घटना पाहायला मिळतात. अनेक तरुण -तरुणी या घटनांना बळी पडल्याचे उदाहरणे आहेत. असाच प्रकार पिंपळनेर शहरात घडला आहे. इन्स्टाग्रामवर रिल्सची प्रशंसा करीत एका तरूणीने मोबाईल रिचार्जसह इतर खर्चाची मागणी तरुणाकडे केली. तरुणाने रिचार्ज केल्यानंतर तरूणीच्या आई-वडिलांसह भावानेही दमदाटी करीत पैशांची मागणी सुरू केल्याने  पिंपळनेर (घोड्यामाळ) येथील तरूणाने पिंपळनेर पोलीस ठाणे गाठून तरूणीसह संबंधीतावर गुन्हा दाखल केला आहे.

यशवंत भिकन सोनवणे रा. घोड्यामाळ, ता.साक्री या २७ वर्षीय तरूणाने दिलेल्या फिर्यादीनुसार, मार्च २०२२ ते दि.८ जून २०२३ दरम्यान त्याची इन्स्टाग्रामवर हंसीका विश्वकर्मा शर्माजी (वय २२) या तरूणीशी ओळख झाली. तरूणीने ‘आपका लुक बहोत अच्छा है, आप बहोत हॅण्डसम हो’ यासह इतर प्रशंसनिय संदेश पाठविले. परिणामी या ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले. त्यानंतर या तरूणीने मोबाईल रिचार्जसाठी व इतर खर्चासाठी पैशांची मागणी केली. मोबाईल रिचार्जसाठी तरुणाने १ हजार ७२० रूपये खर्च केले. त्यानंतर तरूणीने तीचे वडिल विश्वकर्मा रायचंद शर्माजी, आई रेणुका विश्वकर्मा शर्माजी व भाऊ अतुल विश्वकर्मा शर्माजी सर्व रा. तेजादेवी विद्यामंदिर मागे, हरदेव नगर बर्रा, कानपुर, उ.प्र.यांची देखील ओळख करून दिली.

त्यामुळे यावर विश्वास बसल्याने तरुणीचा लग्नास होकार असल्याची समजूत तरुणाची झाली. मात्र त्यानंतर तरूणीने ‘तुझा माझा काहीच संबंध नाही, मला मॅसेज अथवा कॉल करायचा नाही, मॅसेज केल्यास खोट्या केस करेल’ अशी धमकी देण्यास सुरूवात केली. तसेच आई- वडील व भाऊ यांनी देखील भ्रमणध्वनीवर वेळोवेळी पैशांची मागणी करून धमक्या दिल्या. या फिर्यादीवरून पिंपळनेर पोलीस ठाण्यात वरील चौघा संशयितांविरूध्द गुन्हा दाखल झाला आहे.

हेही वाचा : 

The post oney Trap : पिंपळनेरच्या २७ वर्षीय तरूणाची हनीट्रॅपद्वारे फसवणूक appeared first on पुढारी.