अ‍ॅड.प्रवीण चव्हाणांसह तिघांविरोधात पुण्यात खंडणीचा गुन्हा

प्रवीण चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा,www.pudhari.news

जळगाव : बीएचआर प्रकरणातील मुख्य सूत्रधार सुनिल झंवर व त्याचा मुलगा सूरज झंवर याला मोक्कामध्ये अडकविण्याची धमकी देत त्यांच्याकडून 1 कोटी 22 लाख रुपयांची खंडणी घेतल्याच्या आरोपातून तत्कालीन सरकारी वकील प्रवीण चव्हाण, जळगावातील शेखर सोनाळकर, चाळीसगावातील उदय पवार यांच्याविरोधात पुण्यातील डेक्कन पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव जिल्ह्यात गाजलेल्या घरकूल घोटाळ्यात जोरदार बाजू मांडणारे सरकारी वकील हे अलीकडच्या कालखंडात पेन ड्राईव्ह बाँबच्या माध्यमातून चर्चेत आले होते. मंत्री गिरीश महाजन आणि भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्या विरोधात कट कारस्थान रचल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला होता. यामुळे त्यांना सरकारी वकील पदावरून देखील हटविण्यात आले होते.

नाशि पदवीधर’चा हाय होल्टेज ड्रामा, भाजपचा सस्पेन्स कायम : शुभांगी पाटील यांना ‘मविआ’चा पाठिंबा

1 कोटी 20 लाखांची खंडणी वसुल…
बीएचआर प्रकरणातील मुख्य संशयीत सुनिल झंवर याला जामीन मिळण्यासाठी सहकार्य करेन तसेच सुरज झंवरला गुन्ह्यात अडकविण्याची भिती निर्माण करुन दोघांना मोक्का केस लावून त्यात अडकविण्याची त्यांनी धमकी दिली. त्यापोटी त्यांनी झंवर यांच्याकडून 1 कोटी 20 लाखांची खंडणी वसुल केल्याप्रकरणी खंडणीचा गुन्हा दाखल झाला आहे. सव्वा कोटीची खंडणी दिल्यानंतर त्यापैकी 1 कोटी रुपये अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी घेतले. तर 20 लाख रुपये उदय पवार यांनी मध्यस्थी करण्याच्या मोबदल्यात घेतले होते. तसेच अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांच्यासह बीएचआरचे तत्कालीन ऑडिटर शेखर सोनाळकर आणि चाळीसगावातील वाईन शॉपचे संचालक उदय पवार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

The post अ‍ॅड.प्रवीण चव्हाणांसह तिघांविरोधात पुण्यात खंडणीचा गुन्हा appeared first on पुढारी.