
नाशिक : पुढारी वृत्तसेवा
महाविकास आघाडीत सगळे भाऊ असून, लहान-मोठा हे कशावरून ठरवायचे? तिन्ही भाऊ एकत्र बसून सूत्र ठरवणार असल्याचे छगन भुजबळ म्हणाले.
राज्यात गेल्या तीन ते चार दिवसांपासून जागा वाटपाबाबत चर्चा रंगत आहेत. या चर्चांना महत्त्व प्राप्त झाले आहे. येणाऱ्या निवडणुकांसाठी राज्यातील महाविकास आघाडी कोणत्या जागांवर लढेल, याबाबत भुजबळांनी माध्यमांशी बोलताना आपले मत व्यक्त केले. यासोबतच जयंत पाटील आणि अजित पवार यांच्यात सारे आलबेल आहे. फोन केला नाही म्हणून काय झाले. आम्ही सगळे सोबतच आहोत, असे देखील ते म्हणाले.
राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अनिल देशमुख हे भाजपच्या वाटेवर आहेत. याबाबत बोलताना भुजबळ यांनी याबाबत अनिल देशमुखांनाच विचारा, कुणाला ऑफर येते का माहिती नाही, मला कल्पना नाही. पण तिकडे गेले तर माणसासहित कपडे धुवून निघता, अशी मिश्किल टिप्पणी केली. देशात जुन्या संसद भवनाचे वेगळे स्थान असून, आता नवनवीन केले जात आहे. पॉलिसी आणि देश चालवणारे पहिल्या क्रमांकाचे भवन आहे. राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन व्हायला हवे. पंतप्रधान हे पक्षाचे लेबल असते. त्यामुळे राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन व्हायला हवे, असे मत भुजबळांनी व्यक्त केले.
हेही वाचा :
- अंडी घालणारा सस्तन प्राणी आणि तोही चक्क सफेद!
- पुण्यातील झोपडपट्ट्यांचे धारावीच्या धर्तीवर पुनर्वसन
- पुण्यातील सात अतिधोकादायक वाडे उतरविले
The post आमचा निर्णय आम्हीच घेऊ, तिन्ही भाऊ एकत्र बसून ठरवू : छगन भुजबळ appeared first on पुढारी.