‘आयएमए’ पत्रकार गुणगौरव सोहळा उत्साहात; दै. पुढारीचे नितीन रणशूर सन्मानित

ranshur www.pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा
पत्रकार आणि डॉक्टरांमध्ये बहुतांश बाबींमध्ये साम्य आहे. दोघांचे सुख-दुख: सारखेच आहे. डॉक्टर हे रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेतात. तर पत्रकार हे सामाजिक आरोग्य सांभाळण्याची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पडतात. प्रत्येक पत्रकारात डॉक्टर दडलेला असल्याचे प्रतिपादन ’आयएमए’चे राज्य उपाध्यक्ष डॉ. अनिरुद्ध भांडारकर यांनी केले.

इंडियन मेडिकल असोसिएशन नाशिकच्या वतीने आयोजित पत्रकारांच्या गौरव सोहळ्यात ते बोलत होते. व्यासपीठावर राज्याध्यक्ष डॉ. रवींद्र कुटे, नाशिक आयएमएच्या अध्यक्षा डॉ. राजश्री पाटील, सचिव डॉ. विशाल पवार उपस्थित होते. पत्रकार सतत चौकस राहून वाईट प्रवृत्तींविरोधात आवाज उठवतात. त्यामुळे पत्रकारांनी समाजहित जपले पाहिजे, असे आवाहन डॉ. भांडारकर यांनी केले. डॉ. कुटे यांनी मार्गदर्शन केले. यावेळी डॉ. किरण शिंदे, डॉ. गीतांजली गोंदकर, डॉ. शलाका बागूल, डॉ. प्रेरणा शिंदे, डॉ. सागर भालेराव, डॉ. मनीषा जगताप, डॉ. माधवी गोरे-मुठाळ आदी उपस्थित होते.

‘दै. पुढारी’च्या नितीन रणशूर यांचा सन्मान
दैनिक ’पुढारी’चे प्रतिनिधी नितीन रणशूर यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. तसेच धनंजय रिसोडकर, मनोहर घोणे, सचिन जैन, जहीर शेख, अरुण मलाणी, प्रवीण बिडवे, गायत्री जेऊघाले, धनंजय बोडके, अनिकेत साठे, प्रशांत सूर्यवंशी, रवींद्र केडिया, आसिफ सय्यद, अतुल भांबेरे, देवयानी सोनार, जितेंद्र येवले, रामदास नागवंशी, चंद्रशेखर गोसावी, आहुजा भारती, अजय भोसले, संतोष सोनवणे आदींना गौरविण्यात आले.

हेही वाचा:

The post ‘आयएमए’ पत्रकार गुणगौरव सोहळा उत्साहात; दै. पुढारीचे नितीन रणशूर सन्मानित appeared first on पुढारी.