काँग्रेसची जनसंपर्क यात्रा चार सप्टेंबरला नाशकात

काँग्रेस पक्ष

सिडको (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा

राहुल गांधी यांच्या भारत जोडो यात्रेच्या पार्श्वभूमीवर अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्या आदेशानुसार तसेच प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या सूचनेनुसार संपूर्ण महाराष्ट्रात जनसंपर्क यात्रेचे नियोजन काँग्रेस विधिमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलेले आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात ही यात्रा येत्या चार सप्टेंबरला येणार आहे.

सदर यात्रा 3 सप्टेंबर ते 12 सप्टेंबरदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात निघणार आहे. नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात ही यात्रा उत्तमनगर, पवननगरमार्गे त्रिमूर्ती चौकात पोहोचणार आहे. या यात्रेत विविध समस्यांबाबत नागरिकांशी संवाद साधून निवेदन स्वीकारले जाणार आहे. यात्रा यशस्वी करण्यासाठी कार्यकर्ते यांनी प्रयत्न करावे, असे आवाहन माजी नगरसेवक अण्णा पाटील यांनी केले. सिडकोतील पाटीलनगर येथील शाळेच्या सभागृहात आयोजित सिडको विभाग काँग्रेसच्या बैठकीत बोलत होते. यावेळी व्यासपीठावर माजी नगरसेवक लक्ष्मण जायभावे, सिडको ब्लॉक अध्यक्ष विजय पाटील, अनुसूचित जमाती अध्यक्ष संतोष ठाकूर, ओबीसी अध्यक्ष गौरव सोनार, ग्रामीण जिल्हाध्यक्ष वंदना पाटील, अमोल साळवे, सुभाष पाटील, भरत पाटील आदी उपस्थित होते.

हेही  वाचा :

The post काँग्रेसची जनसंपर्क यात्रा चार सप्टेंबरला नाशकात appeared first on पुढारी.