जळगाव : जिल्ह्यातील एरंडोल नगर परिषदेच्या हद्दीमध्ये कुस्तीच्या आखाड्याच्या बांधकामाचे आदेश नसताना एका खाजगी ठेकेदाराने अर्ध्यापेक्षा जास्त काम पूर्ण केले आहे. याबाबत माजी नगराध्यक्ष दशरत महाजन यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार केली आहे.
याबाबत दशरथ महाजन यांनी जळगावात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख हर्षल माने उपस्थित होते. एरंडोल नगरपालिका यांच्या वतीने निविदा प्रदर्शित झाली असून सदर निविदेची अंदाजित रक्कम ९,९५,८२९/- इतकी आहे. उपरोक्त निविदेसाठी अर्जाची अंतिम तारीख ०७ नोव्हेंबर होती. कोणालाही काम करण्याचे आदेश नगरपालिकेच्या वतीने दिलेले नाहीत. असे असताना देखील एका खाजगी कंत्राटदाराने सदर जागेवरील व्यायाम शाळेचे बांधकाम अर्धे अधिक पूर्ण केले आहे. कोणताही कार्यारंभ आदेश नसताना सदरचे काम अर्धे अधिक पूर्ण केले असून सदरच्या कामात मुख्याधिकारी विकास रमेश नवाळे यांची गुपित भागीदारी असल्याची एरंडोल शहरात चर्चा आहे. तसेच नवाळे यांचेकडून सदर कामाचे कार्यारंभ आदेश सदर इसमाच्याच नावाने देण्याचे देखील नवाळे यांनी आश्वासन दिल्याचे कळते. सदर बाब गंभीर असून मुख्याधिकारी यांची उपरोक्त कृती हि लोकसेवक या नात्याने फौजदारी न्यास भंग, भारतीय दंड संहितेच्या कलम ४०९ अन्वये दखलपात्र गुन्हा आहे. सदर बाबीची गंभीर दखल घेऊन आपल्या स्तरावर विभागीय चौकशीचे आदेश द्यावेत तसेच विकास रमेश नवाळे यांचेवर गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात यावी अशी मागणी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचेकडे करण्यात आली आहे. माजी नगराध्यक्ष दशरथ महाजन यांनी ही तक्रार केली आहे.
हेही वाचा :
- Pune News : धूलिकण रोखण्यासाठी बांधकामे झाकावी लागणार
- Maratha Reservation : कुणबी नोंदी शोधण्यासाठी 70 भाषावाचक
- Horoscope Today | आजचे राशिभविष्य | जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा जाईल? | गुरूवार, ९ नोव्हेंबर २०२३
The post कामाचे आदेश नसताना बांधकाम पूर्णत्वास : दशरथ महाजन यांची तक्रार appeared first on पुढारी.