देवळा(जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा नाफेड महाराष्ट्र राज्याच्या संचालक पदी नाशिक जिल्ह्यातील देवळा येथील कळवण शेतकरी सहकारी संघाचे चेअरमन केदा आहेर यांची मंगळवारी (दि. २१ ) रोजी निवड झाली. या निवडणुकीसाठी राज्यातून तीन उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते. त्यात केदा आहेर यांचा विजय होऊन त्यांची संचालक पदी निवड झाल्याने देवळयात आहेर समर्थकांनी फटाक्यांची आतषबाजी करून जल्लोष केला.
केदा आहेर यांनी देवळा ऍग्रो च्या माध्यमातून गेल्या चार पाच वर्षांपासून शेती संबंधीपिकांवर उद्योगाच्या माध्यमातून आपले कामकाज सुरु केले असून, देवळा अॅग्रोला जिल्ह्यातून प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी इतर राज्यात ऍग्रो प्रोड्युसर च्या माध्यमातून आपले काम सुरू ठेवल्याने इतरत्र आहेर यांचे संबंध चांगले प्रस्थापित झाल्याने त्यांना ह्या निवडणूकीत याचा लाभ मिळाला.
याअगोदर त्यांनी नाशिक जिल्हा परिषदेत कृषी सभापती म्हणून काम पाहिले आहे. देवळा बाजार समितीचे सभापती ते नाशिक जिल्हा मजूर फेडरेशन, जिल्हा बँकेचे अध्यक्ष पद, भाजपा जिल्हाध्यक्ष, नाशिक लोकसभा निवडणूक प्रमुख अशी एक ना अनेक जिल्हास्तरावरील पदे त्यांनी भूषविले आहेत. त्यांच्या ह्या निवडीने निश्चितच शेतकऱ्याचे हित साधेल अशी अपेक्षा जिल्हा वाशीयांकडून आहे.
हेही वाचा –