खर्डेत श्रीराम जन्मोत्सवानिमित्ताने रथ मिरवणूक ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

देवळा ; खर्डे ता. देवळा – येथे श्रीराम नवमी निमित्ताने श्रीराम मंदिराला रंग रंगोटी व विद्युत रोषणाई करण्यात आली. बुधवार दि. १७ रोजी मंदिरात श्रीराम जन्मोत्सव निमित्ताने सकाळी ९ ते १२ पर्यंत ह भ प अनंत महाराज कजवाडेकर यांचे काल्याचे कीर्तन आयोजित करण्यात आले आहे. दुपारी तीन वाजता रथाचा लिलाव होऊन मानकऱ्यांच्या शुभहस्ते रथाची सम्पूर्ण गावातून टाळ मृदुंगाच्या गजरात मिरवणूक काढण्यात येईल.

खर्डे येथे बुधवार दि. १७ एप्रिल रोजी राम नवमीपासून यात्रोत्सवाला सुरुवात होते. यासाठी यात्रोत्सव कमिटीची स्थापना करण्यात आली आहे. याठिकाणी दुष्काळी परिस्थिती असतांना देखील गावकर्यांनी यथाशक्तीने वर्गणीच्या माध्यमातून सहकार्य केले असल्याची माहिती कमिटीचे अध्यक्ष सुखदेव देवरे, उपाध्यक्ष भास्कर बाबा जाधव यांनी दिली.

यात्रेनिमित्त गुरुवारी दि. १८ रोजी रात्री ८ वाजता भारुडाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून शुक्रवारी दि १९ रोजी दुपारी ३ वाजता भव्य कुस्त्यांची दंगल भरविण्यात येणार आहे. तर रात्री ९ वाजता दत्ता महाडिक पुणेकर यांचा लोकनाट्य तमाशा होईल, गावकर्यांनी याचा लाभ घेऊन सर्व कार्यक्रमांना सहकार्य करावे असे आवाहन यात्रा कमिटीने केले आहे.

हेही वाचा –

The post खर्डेत श्रीराम जन्मोत्सवानिमित्ताने रथ मिरवणूक ; विविध कार्यक्रमांचे आयोजन appeared first on पुढारी.