गोंदेगावला वीज पडून मेंढपाळाचा मृत्यू

लासलगाव : निफाड तालुक्यातील गोंदेगाव येथे वीज पडून मेंढपाळाचा मृत्य झाल्याची घटना घडली आहे. बापू अशोक वैद्य (२९, रा. ममदापूर) असे मृताचे नाव आहे. मंगळवारी (दि.४) सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास गोंदेगाव शिवारात मेंढ्या चराई करत असताना वैद्य यांच्या अंगावर वीज कोसळली. त्यांना तत्काळ लासलगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, डॉ. पाटील यांनी त्यांना तपासून मृत घोषित केले.

हेही वाचा-