
जळगाव : पुढारी वृत्तसेवा
जळगाव तालुक्यातील चिंचोली गावाताली ११ वर्षीय बालकाचा धरणाच्या पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. ही घटना सोमवारी (दि. १५) दुपारी चारच्या सुमारास धानवड गावाजवळील धरण परिसरात घडली. करण जयराम पवार (वय ११) असे मृत बालकाचे नाव आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, चिंचोली गावातील करणचे वडील जयराम पवार हे ट्रॅक्टरचालक आहेत, तर आई सुनीता शेतात जाऊन आपला उदरनिर्वाह करतात. सोमवारी १५ मे रोजी सकाळी आई व वडील हे शेतात कामासाठी निघून गेले. दुपारी ४ च्या सुमारास करण हा गावातील मित्रांसोबत जवळच असलेल्या धानवड गावातील धरणात पोहण्यासाठी गेला. यावेळी धरणाच्या पाण्यात बुडून त्याचा मृत्यू झाला. ही बाब ग्रामस्थांच्या लक्षात येताच, त्यांनी धाव घेत करणचा मृतदेह बाहेर काढला. याबाबत एमआयडीसी पोलिसांनी पंचनामा केला.
हेही वाचा:
- Zara Hatke Zara Bachke Trailer: विक्की कौशल-साराने पार केल्या रोमान्सच्या सर्व मर्यादा
- पारनेर : राष्ट्रवादीने शिवसेनेला फसविले : डॉ. श्रीकांत पठारे
- मुंबई : अमिताभ बच्चन आणि अनुष्काला विनाहेल्मेट दुचाकीवरून प्रवास पडणार महागात, पोलिसांकडून होणार कारवाई
The post जळगावला धरणात बुडून ११ वर्षीय बालकाचा मृत्यू appeared first on पुढारी.