जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात मोठे बदल; अधिकाऱ्यांच्या बदल्या

जळगाव : पुढारी वृत्तसेवा

जिल्ह्यातील सात पोलीस ठाण्यातील सहाय्यक पोलीस निरीक्षकांच्या नुकत्याच बदल्या करण्यात आल्या. त्यानंतर आता जिल्ह्यातील चार उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. या बदल्यांमध्ये जिल्ह्यामध्ये तीन अधिकारी नव्याने दाखल होणार आहेत.

राज्याच्या गृहविभागाने बदल्यांचे आदेश काढले आहेत. यात बदली झालेल्या अधिकाऱ्यांना नियुक्तीस्थळी तातडीने रुजू होण्यासंदर्भात आदेशित करण्यात आले आहे. तर बदल्यामध्ये जळगावचे डीवायएसपी संदीप गावित यांची पाचोरा विभागात बदली करण्यात आली आहे. राकेश जाधव यांची अमळनेर येथून जालना येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात बदली झाली आहे. आर्थिक गुन्हे शाखेचे डीवायएसपी भास्कर डेरे यांची पिंपरी चिंचवडच्या सहाय्यक पोलीस आयुक्तपदी बदली झाली आहे तर भुसावळचे डीवायएसपी सोमनाथ वाघचौरे यांची संगमनेरच्या उपविभागीय पोलिस अधिकारीपदी बदली झाली आहे. याशिवाय मुक्ताईनगर येथे डीवायएसपी म्हणून राजकुमार शिंदे हे बदली होवून येणार आहेत. त्याचप्रमाणे जळगावच्या संदीप गावित यांच्या जागी चंद्रपूर येथील डीवायएसपी सुशीलकुमार नायक येणार आहेत. तर सोमनाथ वाकचौरे यांच्या जागी भुसावळ डीवायएसपी म्हणून विक्रांत गायकवाड येणार आहेत.

हेही वाचा:

The post जळगाव जिल्ह्यातील पोलीस दलात मोठे बदल; अधिकाऱ्यांच्या बदल्या appeared first on पुढारी.