जळगाव : हतनुर धरणाचे ३० दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले

हतनुर धरण,www.pudhari.news

जळगाव : जिल्ह्यात पावसाने लावलेल्या दमदार हजेरीमुळे हतनूर धरणाचे पाणलोट क्षेत्र भरले आहे. त्यामुळे आज सकाळी धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत. यामुळे तापी नदीला पूर आल्‍याने नदी काठच्‍या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

जळगाव जिल्ह्यात मंगळवारी रात्रीपासून पावसाला सुरुवात झाली आहे. या पावसामुळे नदीनाले भरून वाहत आहे. तसेच मध्य प्रदेशातल्या तापी नदीच्या उगम स्थानाच्या परिसरात झालेल्या पावसामुळे हतनूर धरणातील पाणीसाठा वाढला आहे. उमगस्थानाजवळच्या पावसाचे पाणीही धरणात वाहून आल्याने हतनूर धरण भरले आहे. त्यामुळे आता धरणाचे ३० दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत. दुपारी १ वाजेपर्यंत धरणाचे ३० दरवाजे उघडण्यात आले आहेत.

१ लाख ५६ हजार क्‍युसेक पाण्याचा विसर्ग

जळगाव जिल्ह्यातील हतनुर धरणाचे ३० दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले असून, धरणाची पाणी पातळी २१०. ८५० मीटर पर्यंत आली आहे. एकुण पाणी साठा २२८.४० दलघमी असून, एकुण पाणी साठा ५८.८७ टक्के आहे. हतनुर धरणातून तापी नदी पात्रात १ लाख ५६ हजार ६५७ क्युसेक्स वेगाने पाण्याचा विसर्ग सोडण्यात येत आहे. त्यामुळे प्रशासनाच्यावतीने तापी नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

हेही वाचा : 

The post जळगाव : हतनुर धरणाचे ३० दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले appeared first on पुढारी.