जळगाव : 2 गावठी पिस्तुलसह १५ काडतुस जप्त

जळगाव – शहरातील शनिपेठ हद्दीमध्ये असलेल्या काटा फाईल नॅशनल जिम जवळ गावठी पिस्तूल घेऊन दहशत पसरवणाऱ्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेने ताब्यात घेतले असता त्याच्या जवळून दोन गावठी पिस्तूल 15 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शहरातील शनिपेठ हद्दीमध्ये असलेल्या काटा फाईल नॅशनल जिम जवळ संशयित आरोपी नमीर खान आसिफ खान (वय-१९) राहणार काट्या फाईल शनिपेठ जळगाव हा स्वतःजवळ गावठी पिस्तूल बाळगून असून तो दहशत निर्माण करीत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. मिळालेल्या माहितीच्या आधारे आरोपीला अटक करण्याच्या सूचना करण्यात आल्या. दि. 29 च्या सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास आरोपीला ताब्यात घेतले असता त्याच्याजवळून दोन गावठी पिस्तूल व पंधरा जिवंत काडतुसे जप्त करण्यात आले. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ. प्रमोद लाडवंजारी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी याच्या विरोधात शनीपेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे करीत आहे.

The post जळगाव : 2 गावठी पिस्तुलसह १५ काडतुस जप्त appeared first on पुढारी.