ठाकरे गटाचे बंडखोर उमेदवार विजय करंजकरांकडे किती संपत्ती?

विजय करंजकर pudhari.news

नाशिक : पुढारी वृत्तसेवा- नाशिक लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे बंडखोर उमदेवार विजय करंजकर यांची कौटुंबीक संपत्ती २८ कोटी ७२ लाख २६ हजार ५३९ रुपये आहे. तर करंजकरांच्या नावे १६ लाख ३१ हजार २९७ रुपयांचे कर्ज आहे. (Vijay Karanjkar)

करंजकर यांनी अपक्ष अर्ज दाखल करताना त्यासोबत प्रतिज्ञापत्रात संपत्तीची माहिती सादर केली आहे. त्यांच्या नावे २ कोटी ५२ लाख ९१ हजार ६२२ रुपयांची जंगम मालमत्ता आहे. पत्नी अनिता यांच्याकडे १ कोटी ३९ लाख ६१ हजार ३१७ रुपयांची संपत्ती आहे. करंजकरांच्या नावे २४३० ग्रॅम साेने असून, त्याचे मूल्य १ कोटी ७० लाख १० हजार रुपये इतके आहे. पत्नी अनिता यांच्याकडे १५०० ग्रॅमचे सोने आहे. त्याचे मूल्य १ कोटी ५ लाख रुपये आहे. करंजकर दाम्पत्याकडे २४ कोटी ७९ लाख ७३ हजार ६०० रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यामध्ये वडिलाेपार्जित व स्व-संपादित केलेल्या मालमत्तेचा समावेश आहे. या व्यतिरिक्त तीन चारचाकी वाहने, एक ट्रॅक्टर व एक दुचाकी त्यांच्या नावे आहे. करंजकरांच्या नावावर सात गुन्हे दाखल आहेत.

गायकरांकडे एक कोटीची संपत्ती

नाशिकमधील वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार करण गायकर यांच्याकडे एक लाख रुपयांची रोख रक्कम असून, २४ लाख ३५ हजारांची जंगम मालमत्ता आहे. त्यांच्याकडे ३२ लाख १० हजारांची स्थावर मालमत्ता दिसत असली तरी जवळपास २१ लाखांची वडिलोपर्जित संपत्ती असल्याचे त्यांनी प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. कुटुंबाच्या नावेदेखील अन्य मालमत्ता आहेत. दिंडोरीतील वंचितच्या उमेदवार मालती थविल यांच्याकडे तीन लाख १२ हजार ६०० रुपयांची चल तर एक लाख रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. त्यांच्या नावे एक लाख ५२ हजार रुपयांचे मुद्रा व वाहन कर्ज आहे.

हेही वाचा-