नाशिक : पुढारी वृत्तसेवा- द मिशन क्वालिटी सिटी, सरपंच संवाद आणि जिल्हा परिषद यांच्या संयुक्तविद्यमाने मंगळवारी (दि. ५) सरपंच कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत प्रशिक्षण व गुणवत्ता विकास सत्रांचे आयोजीत केले असून, या उपक्रमात ३०० पेक्षा जास्त सरपंच सहभागी होणार असल्याची माहिती क्वालिटी कौन्सिल ऑफ इंडियाचे कार्यकारणी सदस्य जितेंद्र ठक्कर यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हाॅटेल गेट वे येथे मंगळवारी सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळात ही सरपंच संवाद होणार आहे. कार्यक्रमास केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, पालकमंत्री दादा भुसे, खासदार हेमंत गोडसे आदी लोकप्रतिनिधी उपस्थिती राहणार आहे. ठक्कर म्हणाले की, संस्थेतर्फे भारतातील पंचायत राज व्यवस्थेला पाठबळ देते व सक्षम करण्यावर भर दिला जातो आहे. या सत्रांच्या माध्यमातून सरपंचांना त्यांच्यासाठी उपयुक्त ज्ञान प्रदान करतांना ख-या अर्थाने सरपंच संवाद घडविला जाणार आहे. मिशन क्वालिटी सिटी नाशिकच्या सहकार्याने राबवत असलेल्या या उपक्रमातून नाशिक ग्रामीणमधील लोकांच्या जीवनावर परीणामकारक बदल घडतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. कार्यशाळेतून कौशल्ये, शिक्षण, आणि स्वच्छता अशा विविध संकल्पना निश्चित करण्यात आलेल्या आहेत. विविध सत्रांच्या माध्यमातून सहभागी सरपंचांना ज्ञान व कौशल्ये प्राप्त होतील. ज्यांचा उपयोग करुन खेड्याचा शाश्वत विकास साध्याच्या दृष्टीने ते धेय्य निश्चिती व पुढील कार्यपध्दती ठरवू शकतील असे मुख्यकार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी सांगितले. यावेळी हेमंत राठी, कुणाल पाटील उपस्थित होते.
विकसीत भारत मोहिमेसाठी भर
या उपक्रमात चळवळीसोबत ४८ संघटना, स्वयंसेवी संस्था आणि सामाजिक संस्था जोडल्या गेल्या आहेत. या संयुक्त उपक्रमातून विकसीत भारत मोहिमेसाठी स्थानिक स्तरावर सक्षमीकरण व नेतृत्व विकासावर भर दिला जात असल्याचे क्युसीआयचे अध्यक्ष जॅक्सय शाह यांनी सांगितले.
हेही वाचा :
- Nashik News | शांततेसाठी गौतम बुद्धांची शिकवण समाजात रुजवा : छगन भुजबळ
- Stock Market Updates | बाजारात रोजच ‘रेकॉर्डब्रेक’ तेजी! निफ्टीवर ‘हे’ स्टॉक्स आघाडीवर
The post तीनशे सरपंच गिरवणार गुणवत्ता विकासाचे धडे, उद्या कार्यशाळा appeared first on पुढारी.