त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी सामाजिक सलोखा जोपासावा : शिंदे

अविनाश शिंदे,www.pudhari.news

नाशिक (सिडको) : पुढारी वृत्तसेवा

त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी सामाजिक सलोखा जोपासला पाहिजे. धर्माधर्मात तेढ निर्माण करून राजकीय पोळी भाजण्याचे षडयंत्र वंचित बहुजन आघाडी हाणून पाडेल, असा इशारा वंचित आघाडीचे महानगरप्रमुख अविनाश शिदे यांनी पत्रकार परिषदेत दिला.

यावेळी महिला जिल्हाध्यक्ष ऊर्मिला गायकवाड, माजी नगरसेवक संजय साबळे, जिल्हा महासचिव बाळासाहेब शिंदे, पंडित नेटावटे, सिडको विभागप्रमुख डॉ. अनिल आठवले, विवेक तांबे, कैलास गांगुर्डे, सूरज गांगुर्डे, सुनील साळवे आदी उपस्थित होते.

शिंदे म्हणाले की, धर्मांधतेला खतपाणी घालणाऱ्या या शक्ती हुडकून त्यांचे समूळ उच्चाटन करणे गरजेचे आहे. कोणत्याही गावातील उत्सव असो की, यात्रा त्यात सर्व समाजाचे आणि विशेषतः मुस्लीम बांधवांचे मोलाचे योगदान असतेच ही वस्तुस्थिती आहे. काही ठिकाणी तर मुस्लीम बांधव उत्सवाचे मानकरी असतात. मग अशा प्रकारे वैरभाव असता कामा नये असेही ते म्हणाले.

हेही वाचा :

The post त्र्यंबकेश्वर मंदिर प्रकरणी सामाजिक सलोखा जोपासावा : शिंदे appeared first on पुढारी.