दारूच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला, चार लाखांचा मुद्देमाल चोरीला

दारु चोरीला,www.pudhari.news

जळगाव : चाळीसगाव शहरातील पेट्रोल पंपाच्या बाजूला असलेल्या दारूच्या दुकानातून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख ८८ हजार २९० रुपये रोख व एक लाख ३७६५ रुपये किमतीची दारू असे एकूण तीन लाख ९२ हजार ६८५ रुपयांचा माल व रोख घेऊन पसार झाले.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, चाळीसगाव शहरातील खरजई रोड, चरण पेट्रोल पंपाच्या बाजूला अमरधाम समोर रॉयल वाईन शॉप दुकान आहे. या दुकानात रात्री ९ वाजताच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी प्रवेश केला. दुकानातील दोन लाख ८८ हजार २९० रुपये रोख व ७७ हजार ३९५ रुपये किमतीचे नाणे, ११२५० रुपये किमतीची ब्लॅक डॉग गोल्डन कंपनीची दारूची बॉटल, आठ हजार रुपये किमतीची जेडब्ल्यू गोल्डन रिव्हर्स कंपनीची दारू व सात हजार एकशे वीस रुपये किमतीची जॉनी वॉकर ग्रीन लेबल कंपनीची दारू असे एकूण तीन लाख ९२ हजार ६८५ रुपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी पळवून नेला.

या प्रकरणी दुकानाचे मालक प्रदीप सत्यवान राजपूत यांनी चाळीसगाव शहर पोलिसात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक सुहास आव्हाड करीत आहेत.

हेही वाचा :

The post दारूच्या दुकानावर चोरट्यांचा डल्ला, चार लाखांचा मुद्देमाल चोरीला appeared first on पुढारी.