नंदुरबार : नदीकाठी आढळले नवजात अर्भक; ओळख पटविण्यासाठी प्रशासनाचे आवाहन

बाळ

नंदुरबार: पुढारी वृत्तसेवा

अक्कलकुवा तालुक्यातील वरखेडी नदीच्या पात्रात दि. 13 डिसेंबर 2022 रोजी अवघ्या एका दिवसाचे स्त्री जातीचे नवजात अर्भक पोलिसांना आढळून आले आहे. या अर्भकावर जिल्हा सामान्य रुग्णालय, नंदुरबार येथे औषधोपचार सुरु असल्याची माहिती जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यु.पी.पाडवी यांनी एका प्रसिद्धी पत्रकान्वये दिली आहे. हे स्त्री जातीचे अर्भक ज्या व्यक्तींचे असेल त्यांनी पुराव्यासह बाल कल्याण समिती अध्यक्ष (9307143016), जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, नंदुरबार (02564-210047) तसेच चाईल्ड लाईन (1098) जिल्हा बाल संरक्षण अधिकारी (9421477143 ) वर संपर्क साधुन सदर अर्भकांस दहा दिवसाच्या आत ताब्यात घ्यावे. त्यानंतर या अर्भकांस शिशुगृहात दाखल करण्यात येईल, असे आवाहन जिल्हा बाल संरक्षण अधिकारी पाडवी यांनी केले आहे.

हेही वाचा:

The post नंदुरबार : नदीकाठी आढळले नवजात अर्भक; ओळख पटविण्यासाठी प्रशासनाचे आवाहन appeared first on पुढारी.