Dhule Crime : पाच जणांकडून आशा वर्करचा विनयभंग

महिलेचा विनयभंग,www.pudhari.news

धुळे, पिंपळनेर : पुढारी वृत्तसेवा
कुष्ठरोग सर्वेक्षणाचे काम करीत असताना राग आलेल्या पाच जणांनी आशा वर्करला बेदम मारहाण करून तिचा विनयभंग केल्याचा प्रकार सकाळी ९ वाजेच्या सुमारास पानखेडा गावात घडला. याप्रकरणी पाच जणांवर सरकारी कामात अडथळा व विनयभंग केल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करून दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

पीडित आशा वर्करने दिलेल्या फिर्यादीनुसार, साक्री तालुक्यातील पानखेडा येथे कर्तव्यावर असताना छगन केवजी देवरे याने आमच्या दारासमोर आलीच का असे  विचारत वाद घातला. यात त्यांना सर्वेचे काम सुरू आहे असे सांगितल्यावर देखील ज्योती संदीप देवरे, रत्ना सोमनाथ बहिरम, सुनिता भिमराव गांगुर्डे, छगन केवजी देवरे, संदीप छगन देवरे सर्व रा.पानखेडा यांनी हाताबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ करीत दमदाटी केली.

संदीप देवरे याने विनयभंग केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या फिर्यादीवरून वरील संशयितांवर पिंपळनेर पोलीस ठाण्यात शासकीय कामात अडथळा व विनयभंगासह मारहाण केल्याबद्दल गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

हेही वाचा :

The post Dhule Crime : पाच जणांकडून आशा वर्करचा विनयभंग appeared first on पुढारी.