
नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा : शेतात कोळपणीसाठी आजोबाने सोबत नेलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून पळविले आणि उसाच्या शेतात ओढून त्यास ठार केले. ही घटना तळोदा येथे बुधवारी (दि.१६) घडली. गुरुदेव भरत वसावे (वय १०,) असे बिबट्याच्या हल्लात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. दरम्यान, बालकाच्या मृत्यूने संपूर्ण तळोदा हदरले आहे.
याबाबत अधिकची माहिती अशी की, खेत्या वसावे (वय ५५. रा. रानमहू) हे त्यांच्या गुरुदेव वसावे या १० वर्षीय नातवाला सोबत घेऊन शेतातील कोळपणीसाठी गेले होते. दरम्यान, कोळपणी करुन परत येत असताना बिबट्याने हल्ला केला आणि १० वर्षीय नातवाला शेतात ओढून नेले. खेत्या पारशी वसावे यांनी आरडा ओरड केल्याने बिबटयाने गुरुदेव याला जखमी अवस्थेत सोडून दिले व निघून गेला. दरम्यान, जखमी बालकामस उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले. दरम्यान, तळोदा तालुक्यातील वाढलेला बिबट्यांचा वावर अतिशय धोकादायक बनला आहे. हा विषय वारंवार ऐरणीवर येत असताना वनखात्याकडून गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे बोलले जात आहे.
हेही वाचलंत का?
- बॉक्स ऑफिसची दिवाळी !!! या वीकेंडला 2 कोटीहून अधिक लोकांनी मोठ्या पडद्यावर पहिले सिनेमे
- Church attacked in Pakistan: पाकमधील फैसलाबादेमध्ये हिंसाचार भडका, चर्चची जाळपाेळ
The post नंदुरबार : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार appeared first on पुढारी.