नाशिक : शिकारी बिबट्या गायीच्या हल्ल्यात जखमी

नाशिक (सिन्नर) :  पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील दोडी येथे गोठ्यात शिकारीसाठी घुसलेल्या बिबट्याला गायीने अक्षरश: लाथांनी तुडवले. गर्भगळीत होऊन निपचित पडलेल्या या बिवट्याला वनविभागाच्या पथकाने भुलीचे इंजेक्शन देऊन ताब्यात घेतले. दोडी खुर्द शिवारात कचरू भिका आव्हाड (६५) हे गट नं २६८ मध्ये वास्तव्यास असून शेजारीच त्याचा जनावराचा गोठा आहे. रविवारी (दि. ३) सकाळी ६ च्या सुमारास …

The post नाशिक : शिकारी बिबट्या गायीच्या हल्ल्यात जखमी appeared first on पुढारी.

उसाचा फड, कादवा काठी आढळतोय बिबट्यांचा अधिवास

नाशिक (दिंडोरी) : पुढारी वृत्तसेवा वरखेडा येथील भुसाळ वस्तीवर बिबट्याने हल्ला चढवून वासराला फस्त केले. शेतकरी बाळासाहेब भुसाळ यांच्या घराजवळील गोठ्यात रात्रीच्या सुमारास बिबट्याने हल्ला केला. जनावरांनीही हंबरडा फोडल्याने शेतमजुराने घराबाहेर धाव घेतली असता बिबट्याने वासराचा फडशा पाडल्याचे दिसले. हातात काठी घेत धाव घेतल्याने बिबट्याने धूम ठोकली. प्रकाश भुसाळ यांनी वनविभागाला माहिती दिली. वनरक्षक ज्ञानेश्वर …

The post उसाचा फड, कादवा काठी आढळतोय बिबट्यांचा अधिवास appeared first on पुढारी.

Leopard Attak : बिबट्याच्या हल्ल्ह्यात ३१ वर्षीय तरुणी ठार; त्रिंगलवाडी येथील दुर्दैवी घटना

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा इगतपुरी तालुक्यात बिबट्याची दहशत (Leopard Attack)  वाढत चालली असून बिबट्याच्या हल्ल्यात आज मंगळवार, दि.30 रोजी एक ३१ वर्षीय तरुणी ठार झाली आहे. निशाणवाडी (त्रिंगलवाडी) येथे ही घटना घडली असून येथील रहिवाशी तरुणीचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे या भागात बिबट्याच्या दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच प्रादेशिक वन …

The post Leopard Attak : बिबट्याच्या हल्ल्ह्यात ३१ वर्षीय तरुणी ठार; त्रिंगलवाडी येथील दुर्दैवी घटना appeared first on पुढारी.

Nashik leopard attack : बिबट्याशी झुंज देत विद्यार्थ्याने वाचविले मित्रांचे प्राण

नाशिक (इगतपुरी) : पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील धार्णोली येथे बिबट्याने विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याची थरारक घटना समोर आली आहे. योगेश रामचंद्र पथवे हा दहावीत शिकणारा विद्यार्थी त्याचे तीन मित्र प्रवीण, नीलेश, सुरेश यांच्यासह शनिवारी सकाळच्या सुमारास घरातून शाळेच्या दिशेने जात असताना दबा धरून बसलेल्या बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. योगेशने प्रसंगावधान राखत मित्रांना बाजूला ढकलून देत बिबट्याशी झुंज …

The post Nashik leopard attack : बिबट्याशी झुंज देत विद्यार्थ्याने वाचविले मित्रांचे प्राण appeared first on पुढारी.

नाशिक : कोडीपाडा येथे युवकावर बिबट्याचा हल्ला, पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी

सुरगाणा; पुढारी वृत्तसेवा : नाशिक जिल्ह्यात बिबट्याचा धुमाकूळ सुरूच असून सुरगाणा तालुक्यातील ठाणगाव शिवारातील कोडीपाडा राक्षसभुवन रोडवर बिबट्याने हल्ला केल्याची घटना रविवारी (दि. १०) रात्री आठच्या सुमारास घडली. प्रमोद हंसराज महाले (दि. १६, रा. कोडीपाडा) असे या जखमी युवकाचे नाव आहे. तो ठाणगाव येथील जय योगेश्वर माध्यमिक विद्यालयात दहावीत शिकत आहे. प्रल्हाद महाले शेतात गेला …

The post नाशिक : कोडीपाडा येथे युवकावर बिबट्याचा हल्ला, पिंजरा लावण्याची शेतकऱ्यांची मागणी appeared first on पुढारी.

नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलगा ठार

दिंडोरी; पुढारी वृत्तसेवा :  दिंडोरी तालुक्यातील निळवंडी शिवारात आज (दि.११) सायंकाळी एका आठ वर्षीय मुलावर बिबट्याने हल्ला करून त्याला ठार केले. गुरु खंडू गवारी (वय ८वर्षे ) असे या मुलाचे नाव आहे. तालुक्यातील दिंडोरी येथे आज सकाळी मेंढपाळावर झालेल्या बिबट्याच्या हल्ल्याची घटना ताजी असतानाच सायंकाळी निळवंडी शिवारात गुरु गवारी या मुलावर बिबट्याने अचानक झडप घालून …

The post नाशिक : बिबट्याच्या हल्ल्यात ८ वर्षीय मुलगा ठार appeared first on पुढारी.

नाशिक : बिबट्याशी अर्धा तास झुंज देत तरुणाने वाचवले स्वतःचे प्राण

सिन्नर (जि. नाशिक) : पुढारी वृत्तसेवा शेतातून घरी परतत असताना अचानक बिबट्याने हल्ला केल्याने जवळपास अर्धा तास झुंज देत तरुणाने स्वतःचा जीव वाचविल्याची घटना तालुक्यातील जामगाव शिवारात मंगळवारी (दि.२२) सायंकाळी सहाच्या सुमारास घडली. अविनाश मधुकर बोडके (२४) असे या तरुणाचे नाव असून, बोडके यात जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात आले. अविनाशची आई, …

The post नाशिक : बिबट्याशी अर्धा तास झुंज देत तरुणाने वाचवले स्वतःचे प्राण appeared first on पुढारी.

नंदुरबार : मालकाच्या अंगावर आला बिबट्या, म्हशीने घेतले शिंगावर अन् वृद्धाचे केले रक्षण

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा :  मुके प्राणी प्रसंगी जीवाची बाजी लावतात आणि मालकाचे संरक्षण करून मालकाच्या प्रती इमान निभावतात; हे अनेक प्रसंगातून पाहायला मिळाले आहे. बिबट्याला शिंगावर घेऊन मालकाचे रक्षण करणारी म्हैस मात्र विरळीच म्हटली पाहिजे. चक्क बिबट्याला शिंगावर उचलून फेकत प्राणघातक हल्ल्यातून वृद्धाला वाचवण्याची घटना तळोदा तालुक्यात घडली. याबाबत सविस्तर वृत्त असे, तळोदा शहरातील बादशाह …

The post नंदुरबार : मालकाच्या अंगावर आला बिबट्या, म्हशीने घेतले शिंगावर अन् वृद्धाचे केले रक्षण appeared first on पुढारी.

नंदुरबार : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार

नंदुरबार, पुढारी वृत्तसेवा :  शेतात कोळपणीसाठी आजोबाने सोबत नेलेल्या चिमुकल्यावर बिबट्याने हल्ला करून  पळविले आणि उसाच्या शेतात ओढून त्यास ठार केले. ही घटना तळोदा येथे बुधवारी (दि.१६) घडली. गुरुदेव भरत वसावे (वय १०,) असे बिबट्याच्या हल्लात मृत्यू झालेल्या बालकाचे नाव आहे. दरम्यान, बालकाच्या मृत्यूने संपूर्ण तळोदा हदरले आहे. याबाबत अधिकची माहिती अशी की,  खेत्या वसावे (वय …

The post नंदुरबार : बिबट्याच्या हल्ल्यात चिमुकला ठार appeared first on पुढारी.

नाशिक : दहिवडला बिबट्याने गायीचा पाडला फडशा

देवळा (जि. नाशिक) पुढारी वृत्तसेवा तालुक्यातील दहिवड येथे शनिवारी (दि. २२) रात्रीच्या सुमारास बिबट्याने गायीचा फडशा पाडला असून, याठिकाणी बिबट्याच्या वाढत्या दहशतीने पशुपालकांत खबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. परिसरात जनावरांवर बिबट्याकडून सतत हल्ले सुरु असून अनेक जनावरे दगावली आहेत. वनविभागाने याची दखल घेऊन दहिवड व परिसरात बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी पिंजरा लावण्याची मागणी येथील ग्रामस्थांनी केली …

The post नाशिक : दहिवडला बिबट्याने गायीचा पाडला फडशा appeared first on पुढारी.